Ahmednagar Accident : नगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा अपघात; अपघातात वाहनधारक…

Ahmednagar Accident : नगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा अपघात; अपघातात वाहनधारक…

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये उड्डाणपुलावर अनेक अपघात (Ahmednagar Accident) होत आहेत. अनेक वर्षांपासून नगरकरांच्या प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित उड्डाणपूल अखेरीस उभा राहिला. पुलावरून वाहतूक देखील सुरु झाली. मात्र या उड्डाणपुलावर आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.

“बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले

सुदैवाने जिवीत हानी टळली…

यातच आज शनिवारी सकाळच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाहनधारक श्रीकांत रंगनाथ घावटे हे छत्रपती संभाजीनगर येथून शिरुरच्या दिशेने प्रवासाला निघाले होते . शहरातील स्टेट बँक चौक ते आरटीओ कार्यालय यादरम्यानच्या वळण मार्गावर खडी पडलेली आहे. दरम्यान हे वाहन यावरून घसरल्याने ते थेट दुभाजकावर जाऊन आदळले. मात्र, चारचाकीत असणारे घावटे यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.

Khichdi 2 Teaser: दिवाळीत फुटणार हास्याचे फटाके, ‘खिचडी 2’ चा टीझर प्रदर्शित 

अपघाताचे सत्र सुरूच…

नगर शहरात उड्डाणपूल हा उभारला गेला त्यानंतर उड्डाणपुलावर अपघाताच्या घटना घडतच आहे. विशेष म्हणेज आजवर अनेकदा झालेले अपघात हे एकाच ठिकाणी झाल्याचे समोर आले आहे. स्टेट बँक चौक ते आरटीओ कार्यालयाच्या मार्गावरील वळणावर आजवर अपघात झाले आहे. दोन अपघातामध्ये तर दुचाकी धारक ते दुभाजकाला धडकून थेट पुलावरून खाली देखील कोसळला आहे.

हो, अजितदादांसमोर मी माझा मुद्दा मोठ्या आवाजात मांडला : भुजबळ

पुलावरील हे वळण धोकादायक बनू लागले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एक चारचाकी वाहन पलटी झाले होते. वाहनधारक देखील अत्यंत वेगाने वाहन चालवत असल्याचे देखील अनेक घटनांमधून समोर आले आहे. वेगाने चाललेल्या वाहनाला वळणावर वेग नियंत्रित न झाल्याने अनेक अपघात घडले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube