औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्या प्रकरणी आज भिंगार बंद
Ahmednagar Breaking News : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाचे पोस्टर झळकवण्यात आले होते. हे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच लव्हजिहाद कायदा व्हावा आदी मागणींसाठी आज अहमदनगरमधील भिंगारमध्ये (Bhingar) बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली असून भिंगारमधील व्यापार पेठ ही कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान भिंगारमधील औरंगजेबचा चौथरा उखडून फेकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला असल्याने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच अहमदनगर शहरात औरंगजेबाचे पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांचा निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांकडून आज रविवारी भिंगार बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान अखंड हिंदू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
जिंतूर-परभणी रोडवर दारूच्या ट्रकला अपघात, जखमीला मदत करण्याचं सोडून लोकांची दारूसाठी धावपळ
गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्या आहेत. यातच अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाची पोस्टर झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर काही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर हिंदुत्ववादी संघटनांकडून उखडून टाकण्याचा इशारा देण्यात आला.
अनिल परबांचा पाय आणखी खोलात! ‘त्या’ प्रकरणात चार्जशीट दाखल; सोमय्यांचा धक्कादायक खुलासा
दरम्यान याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भिंगारमधील आलमगीर येथील औरंगजेबाच्या मदरशाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. यातच आता या घटनांचे वाढते प्रकार पाहता आता भिंगारमध्ये देखील हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनांचा निषेध म्हणून भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे.