फक्त शहर नाही, संपूर्ण जिल्हाच ‘अहिल्यानगर’; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
Ahilyanagar : अहमदनगरच्या (Ahmednagar) नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिलीयं. त्यामुळे आता अहमदनगरचे अहिल्यानगर (Ahilyanagar) नामांतर झाले आहे. यासंदर्भातील राजपत्रित आदेशही जारी झालायं. मात्र, अहमदनगर शहराचे नाव बदलले की जिल्ह्याचे हे स्पष्ट नव्हतं. राजपत्र आदेश जारी झाल्यानंतर अहमदनगर शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला आता अहिल्यानगर म्हणावे लागणार असल्याचं क्लिअर झालंय. राज्य सरकारकडून राजपत्रात अधिसूचना जाहीर करण्यात आलीयं.
बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करून…; शेलारांची ठाकरे पित्रा-पुत्रांवर बोचरी टीका
राज्य सरकारने आता राजपत्र जारी केल्यामुळे अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात कोणताही अडथळा राहिलेला नाही. आता फक्त अहमदनगर शहराचेच नाही तर जिल्ह्याचे नाव यापुढे “अहिल्यानगर” असं होणार आहे. याबाबत राजपत्रांमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे. या आधी केवळ शहराचे नाव अहिल्यानगर करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, आता जिल्ह्याचे नाव देखील अहिल्यानगर करण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे.
जागावाटपाचा पेपर महायुतीने सोडवला आता फक्त…; फडणवीसांनी सगळं-सगळं सांगितलं
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. नागरिकांच्या या मागणीनंतर महायुती सरकारने नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार केला. नगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत होत असल्याने प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी केले आहे. अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वे स्टेशन देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमुद केले होते.