अहमदनगर शहर स्थापनेला 533 वर्षे पूर्ण

अहमदनगर शहर स्थापनेला 533 वर्षे पूर्ण

Ahmednagar Foundation Day : काना मात्रा वेलांटी नसलेले आगळंवेगळं तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारे अहमदनगर शहर होय. सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिनानिमित्त आज रविवारी (28 मे) रोजी शहराचे संस्थापक अहमद निजामशहा (Raja Malik Ahmed, the founder of Ahmednagar) यांच्या बागरोजा येथील कबरीवर सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या हस्ते चादर अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मशाल प्रज्वलीत करुन एकात्मतेचा संदेश यामाध्यमातून देण्यात आला.

कपाळावर टीळा, गळ्यात माळ; केदारनाथनंतर आता अक्षय कुमार बद्रीनाथच्या दर्शनाला, व्हिडिओ व्हायरल

हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. शहराच्या वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी व शहर वसविणार्‍या राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी शहराच्या स्थापना दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असतो. या कार्यक्रमात शहराच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला जातो.

अहमदनगरची विशेष ओळख असलेल्या वास्तू

शहर स्थापनेला 533 वर्षे पूर्ण
जगात फार थोडी शहरं अशी आहेत की ज्यांच्या स्थापनेचा दिवस कुठेतरी इतिहासात नोंदविण्यात आला आहे. त्यातलंच एक शहर म्हणजे अहमदनगर. काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ अशी ओळख असलेल्या आपल्या अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 ला झाली. आज नगर शहराचा 533 वा वाढदिवस. म्हणजे शहर स्थापनेला आज तब्बल 533 वर्षे पूर्ण झालीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube