नगरचं रेल्वे स्टेशन टाकणार कात! मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळणार नवा ‘लूक’

नगरचं रेल्वे स्टेशन टाकणार कात! मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळणार नवा ‘लूक’

Ahmednagar News : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्याच्या सौंदर्यात आता आणखी भर पडणार आहे. कारण नगरचे रेल्वे स्टेशन आता आणखी समृद्ध होणार आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, बेलापूर व नगर शहरातील रेल्वे स्टेशनला भरघोस निधी प्राप्त झाला आहे. यामुळे आता या तिन्ही रेल्वे स्थानकांचा आता कायापालट होणार आहे.

नगरच्या रेल्वे स्थानकाचा समावेश अमृतभारत स्टेशन योजनेत करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत नगर रेल्वे स्थानकाच्या अत्याधुनिकीकरण कामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (06 ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती सोलापूर मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल संरक्षण अधिकारी शिवाजी कदम यांनी दिली.

गोऱ्हेंची खुर्ची वर्षभरासाठी सेफ! अधिवेशनात शेवटच्या दिवशी भाजपचा मास्टरस्ट्रोक; ठाकरे गट बुचकळ्यात

कदम म्हणाले, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत सोलापूर मंडळातील 15 रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे. यात नगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर जंक्शन, बेलापूर व कोपरगाव रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. यामध्ये या रेल्वे स्टेशनच्या विकासकामी काही निधी देखील मंजूर झाला आहे. यामध्ये कोपरगाव रेल्वे स्टेशन विकसित करण्यासाठी 29 कोटी 94 लाख रुपये तर बेलापूर रेल्वे स्टेशन विकसित करण्यासाठी 31 कोटी 96 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अशा असणार नव्या सुविधा

नगर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. यातच आता सरकारच्या एका नव्या योजनेद्वारे नगर शहरातील रेल्वे स्थानक हे पहिल्यापेक्षा अधिक सुविधांनी सज्ज होणार आहे. स्टेशनची केवळ रंगरंगोटीच नव्हे, तर रेल्वे स्टेशनला आधुनिकतेची जोड देखील मिळणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयकडून 31 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या निधीद्वारे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणार आहे.

प्रवाशांसाठी खास अत्याधुनिक प्रतीक्षालय, पार्किंग सुविधा अशा सेवा उपल्बध करून देण्यात येणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत स्थानकावर सोलर प्रकल्प, वॉटर कुलर, एअर कंडिशनर आणि डिजिटल घड्याळ, अशा सुविधा प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर त्या त्या शहरातील कला व संस्कृतीची माहिती स्थानक परिसरात दिली जाणार आहे.

गोऱ्हेंची खुर्ची वर्षभरासाठी सेफ! अधिवेशनात शेवटच्या दिवशी भाजपचा मास्टरस्ट्रोक; ठाकरे गट बुचकळ्यात

आता दोन्ही बाजूने प्रवेश मिळणार

नगर रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. मात्र प्रवाशांना आत मध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ प्रवेशद्वार होते. मात्र आता नव्या योजनांतर्गत प्रवाशांची सोय पाहता बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी समोरचा परिसर खुला केला जाणार आहे. त्यामुळे स्थानकात येण्यासाठी दोन्ही बाजूने प्रवाशांना प्रवेश मिळणार आहे, असे कदम यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube