बाळासाहेब विखेंची योजना सरकारने स्वीकारली; फडणवीसांनी सांगितलं, जिल्हा सुजलाम करण्याचं व्हिजन

बाळासाहेब विखेंची योजना सरकारने स्वीकारली; फडणवीसांनी सांगितलं, जिल्हा सुजलाम करण्याचं व्हिजन

Ahmednagar News : राज्य सरकारने सिंचनासाठी अनेक योजनांना मंजुरी दिली आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याची योजना सुरू करण्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रयत्न केले होते. वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हे सुजलाम सुफलाम करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. आता वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. या योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) व खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी पुढाकार घेत साकळाई योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरी सत्काराची कल्पना मांडली होती. त्यानुसार आज नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात फडणवीस ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे, नगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, विक्रम पाचपुते, अक्षय कर्डिले आदी उपस्थित होते.

वाचा : सोहळा फडणवीसांप्रती पण कर्डिलेंनी अजित पवारांनाच धुतलं..

फडणवीस यांनी आपल्या भाषणात कर्डिले, पाचपुते, विखे यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, की राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेत सर्वात जास्त शेततळे नगर जिल्ह्यात झाले आहेत. मंत्री विखे यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने निळवंडेला फेरप्रशासकीयड मान्यता देऊन 11 हजार कोटी रुपयांचा निधीही दिला. आताही जिल्ह्यात राज्य सरकार खासदार सुजय विखे, शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून आणि मंत्री विखे यांच्या नेतृत्वात सिंचनाच्या अनेक योजना मंजूर केल्या जात आहेत. त्यासाठी निधीही दिला जात आहे. त्यातून परिवर्तन करतोय, असे फडणवीस म्हणाले.

कर्डिले साहेबांकडून पैसे घेऊ

जिल्ह्यात सिंचनाच्या अनेक योजना मंजूर केल्या जात आहेत. त्यासाठी भरघोस निधीही दिला जात आहे. मात्र मी त्या दिवशीही सांगतिले हे सगळं करत असताना मी आधीही सांगितले होते त्याप्रमाणे आता शिवाजी कर्डिले जिल्हा बँकेचे चेअरमन झाले आहेत. तेव्हा पैसे कमी पडले तर त्यांच्याकडूनच घेऊ. तर सरकारला कर्ज बिर्ज लागले तर त्याची तयारी ठेवा एवढी विनंती करतो असे फडणवीस म्हणताच जोरदार हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

शिंदे-फडणवीस हे असंवेदनशील आणि वाचाळवीरांचं सरकार; सुप्रिया सुळेंचा घणाघात

फडणवीस मध्येच थांबले

सभेत फडणवीस यांचे भाषण सुरू असताना एकदा अचानक खासदार सुजय विखे उठले आणि सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना सूचना देऊ लागले. त्यामुळे काही वेळ फडणवीस यांना आपले भाषण थांबवावे लागले. खरे तर सुजय विखे उपस्थितांना माईकवरून सूचना देत खाली बसण्यास सांगत होते. अद्याप कार्यक्रम संपलेला नाही. अजून मंत्री विखे पाटील, आणि कर्डिले यांचीही भाषणे राहिलेली आहेच. कार्यक्रम अजून एक तास चालणार आहे. काहीच झालेले नाही तेव्हा खाली बसा अशा सूचना ते सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना देत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube