Ahmednagar News : मोठी बातमी ! तब्बल एक कोटींची लाच घेताना अधिकारी जाळ्यात
Ahmednagar News : नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर शहरात (Ahmednagar News) एका अधिकाऱ्याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने नगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली. नगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अमित किशोर गायकवाड (वय 32 रा. आनंदविहार नागापूर, अहमदनगर) याला नाशिकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, काल रात्रीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक नगरमध्ये दाखल झाले होते. सापळा रचून अतिशय सावधगिरीने ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे देखील उपस्थित होते.
महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने CM भूपेश बघेलांना दिले 508 कोटी; ईडीचा खळबळजनक दावा
पथकाने याबाबत गायकवाडकडे अधिक चौकशी केली. त्यानंतर तत्कालीन सहायक उपअभियंता आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याची माहिती समोर आली. त्यानंतर यो दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात आज पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी नाशिक येथून चार ते पाच पथके रवाना करण्यात आली होती. नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर या कारवाईत सहभागी झाल्या होत्या.
शासकीय ठेकेदार यांनी नगर येथील औद्योगिक विकास महामंडळांतर्गत 100 एमएम व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रुपयांचे बिल मिळावे म्हणून सदर बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करून त्यावर त्याच्या सह्या घेऊन सदरचे देयक पाठविण्याच्या मोबदल्यात गायकवाडने स्वतःसाठी तसेच वाघ याच्यासाठी बिलाच्या कामाचे तसेच आधी दिलेल्या काही बिलांचे बक्षीस म्हणून एक कोटी रुपये लाच मागितल्याची माहिती आहे. अशा स्वरुपाची तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
साहेब पाकिट मिळालं, तुमचा हिस्सा कुठे पाठवू ?
यानंतर नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेंडी परिसरात सापळा रचला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रुपयांची रक्कम अधिकाऱ्याने पंचांसमक्ष स्वीकारली आहे. इतकेच नाही तर गायकवाड याने त्याच्या फोनवरून वाघ याला फोन करत लाचेची रक्कम स्वीकारल्याची माहिती दिली. या घटनेने नगर शहरातील कार्यालयांतही मोठी खळबळ उडाली असून आज याच कारवाईची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
Pakistan : पाकिस्तानात मोठा हल्ला! हवाई तळात दहशतवाद्यांची घुसखोरी, गोळीबार सुरू