पाणी सोडा, अन्यथा… निळवंडेच्या पाण्यासाठी थोरातांचा आक्रमक ‘मूड’

पाणी सोडा, अन्यथा… निळवंडेच्या पाण्यासाठी थोरातांचा आक्रमक ‘मूड’

Ahmednagar Politics : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. नगर जिल्ह्यात देखील यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परस्थिती पाहता निळवंडे धरणातून तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा थोरात यांनी दिला. थोरात यांच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील पाण्याचं राजकारण (Ahmednagar Politics) आणि विखे-थोरात वाद आणखीच वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

‘अण्णांना गुंडाळलं पण, मनोज जरांगे’.. राऊतांचा सरकारला राखठोक इशारा

नगर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याअभावी बळीराजाचे मोठे हाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातच पाण्याअभावी शेतामधील पिके जाळून गेली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाने त्यांना पीक विम्याद्वारे मदत करणे अपेक्षित आहे. तसेच बळीराजा आर्थिक संकटाला सामोरे जात असल्याने शासनाने तातडीने बैठक घेत उपाययोजनांवर चर्चा करणे अपेक्षित आहे, असे थोरात म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पाणी बंद

जिल्ह्यात पावसाअभावी पिके जळून चालली आहे. जिल्ह्यातील निळवंडे धरण (Nilwande Dam) हे दुष्काळग्रस्त भागासाठी झाले आहे. धरणाचे पाणी केवळ मे महिन्यात चाचणीसाठी सोडले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि थोरात यांचे कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

या नेत्यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले होते. मात्र त्यांची पाठ फिरताच पाणी बंद करण्यात आले. ते आजतागायत सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात पाणीसाठा असताना देखील पाणी बंद करण्यात आले. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे तातडीने निळवंडेचे पाणी सोडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याबाबतचा निर्णय तातडीने घेण्यात यावा. जनतेला आंदोलनास भाग पाडू नये असा इशारा देखील यावेळी थोरात यांनी दिला आहे. थोरात यांच्या या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील राजकारण (Ahmednagar Politics) तापण्यास सुरुवात झाली आहे.

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नये; रोहित पवार आक्रमक

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube