‘अण्णांना गुंडाळलं पण, मनोज जरांगे’.. राऊतांचा सरकारला राखठोक इशारा

‘अण्णांना गुंडाळलं पण, मनोज जरांगे’.. राऊतांचा सरकारला राखठोक इशारा

Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून (Maratha Reservation) निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घडामोडींवर भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्यावर टीका केली.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी (Maratha Reservation) आपला प्राण पणाला लावला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कधीकाळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात आंदोलन केले होते. तेव्हाही हेच गिरीश महाजन मध्यस्थी कराला गेले होते. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. आजही भ्रष्टाचार आहे. ते फक्त अण्णांना गुंडाळून आले. पण, मनोज जरांगे गुंडाळले जाणारे व्यक्तिमत्व नाही. मनोज जरांगे पाटील हा फकीर माणूस आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. या अत्यंत साध्या माणसाने शिंदे सरकारला जेरीस आणले. ते झुकणार नाहीत, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

‘उदयनिधींच्या वक्तव्याने देशातील 90 कोटी हिंदूंच्या’.. ठाकरे गटानेही फटकारलं !

.. तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार – जरांगे

सरकारने जीआर काढला, त्यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील’ असं म्हंटलं आहे. पण यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी असतील’ हे तीन शब्द काढून टाका आणि ‘सरसकट मराठा समाजाला’ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी त्यात दुरुस्ती करा, अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर केली.

सरकारने काल एक निर्णय घेतला. यानुसार, ज्यांच्याकडे वंशावळ आहे त्यांना आजपासून कुणबी (Maratha Reservation) प्रमाणपत्र देतो, असे सांगितले आहे. यातून आपल्या मागण्यांपैकी एक महत्वाची मागणी मान्य झाली आहे. पण आमची मुख्य मागणी आहे की, सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही आहे. कारण आमच्याकडे कोणाकडेही वंशावळीच्या नोंदी असलेल्या पुरावे नाहीत. त्यामुळे याचा आम्हाला एक टक्काही फायदा होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे वंशावळ आहे त्याला सरकारकडे कशाला जावे लागेल, तो तहसिलदार ऑफिसला जाऊन जात प्रमाणपत्र काढेल. त्यासाठी जीआरची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube