Ahmednagar Rain : नगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

Ahmednagar Rain : नगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. यातच काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये जोरदार पावसाने नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. यातच आता नगरकरांसाठी पुन्हा एकदा हवामान विभागाने महत्वाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.

अहमदनगरमध्ये राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळणार आहे. असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी तसेच आपत्तीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हुश्श! पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल 30 तास 20 मिनिटांनी सांगता

या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा. अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत.

Pushpa 2 मधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी रॉकस्टार डीएसपी पुन्हा सज्ज

त्याचबरोबरवर नागरिकांना आपत्कालीन स्थितीसाठी संपर्क क्रमांक देखील देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा. असं आवाहन करण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube