नगरकरांसाठी खुशखबर! भंडारदरा 75 तर मुळा धरण 50 टक्के भरले

  • Written By: Published:
नगरकरांसाठी खुशखबर! भंडारदरा 75 तर मुळा धरण 50 टक्के भरले

Ahmednagar Rain Update : देशासह राज्यात अनेक ठिकाणी मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले असल्याने संबंधित ठिकाणच्या नद्या, धरणे यांच्या पाणीसाठ्यात मोठी आवक झाली आहे. यातच नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा जुलै महिन्यातच 75 टक्के भरले आहे. तर दुसरीकडे मुळा धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. मुळा धरण रविवारी पर्यंत 50 टक्के भरले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान धरण साठ्यातील पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळते आहे.(Ahmednagar Rain Update Bhandara Dum 75 percent and Mula Dam 50 percent )

नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी मान्सूनने चांगलीच हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील जीवनदायनी असलेल्या भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांमधेय चांगला पाऊस झाला आहे. पावसाचा वाढता जोर पाहता धरणामध्ये पाण्याची आवक देखील वाढली आहे. या पावसामुळे परिसरातील भात खाचरे ओसंडून वाहू लागले आहेत. डोंगर कड्यावरून धबधबे जोमाने कोसळत असून ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. धुक्याने डोंगरदर्‍या झाकाळून गेल्या असून मनमोहक वातावरणात धबधबे वाहते आहेत. पावसामुळे फुललेले सौंदर्य पाहण्यासाठी शनिवारी व रविवारी सुटी असल्याने पर्यटकांनी गर्दी केली होती.

Ahmednagar ST Bus : धक्कादायक! एसटी चालकाला आली झोप, बसचे स्टेअरिंग थेट कंडक्टरच्या हाती

भंडारदरा लवकरच 80 टक्के भरणार…

सध्या सुरु असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणात पाणी साठा वाढत आहे. सध्या स्थितीला हे धरण 75 टक्के भरले आहे. दरम्यान11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदराचा पाणीसाठा 8665 दलघफूवर पोहचला होता. भंडारदरात अशाच प्रकारे पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास येत्या काहीच दिवसात या धरणातील पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहचण्याची शक्यता आहे.

सलग तिसऱ्या वर्षी मुळा धरण जुलै महिन्यातच निम्मे भरले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुळा धरणाच्या पाणीसाठ्याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते. 26 टीएमसी क्षमता असलेले मुळा धरण काल रविवारी रात्री 50 टक्‍के भरले आहे. जुलै महिन्यातच मुळा धरण निम्मे भरल्याने यंदाच्या वर्षी देखील हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरपलो होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube