Ahmednagar ST Bus : धक्कादायक! एसटी चालकाला आली झोप, बसचे स्टेअरिंग थेट कंडक्टरच्या हाती

Ahmednagar ST Bus : धक्कादायक! एसटी चालकाला आली झोप, बसचे स्टेअरिंग थेट कंडक्टरच्या हाती

Ahmednagar ST Bus : प्रवाशाच्या हक्काची व सुरक्षित प्रवासाची जोडीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीने अनेकांनी प्रवास केला असेल. मात्र नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील एका लालपरीमध्ये प्रवास करताना प्रवाशांचा जीव अक्षरशः गळ्याशी आला होता. बस चालकाला चालू प्रवासातच झोप येऊ लागली. त्याला झोप आवरेना त्यामुळे त्याने बसचे स्टेअरिंग थेट आपला सहकारी कंडक्टरच्या हाती दिले. हा प्रकार राहुरी ते श्रीरामपूर दरम्यान घडला आहे. दरम्यान दोनदा बसचा अपघात होता होता वाचला असे प्रवाशांनी सांगितले. (Ahmednagar ST Bus Driver sleep and bus steering give in Conductors hand )

UPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅडर वाटप; राज्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेसाठी सज्ज

याबाबतची अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्याहून श्रीरामपूरकडे निघालेली एक परिवहन महामंडळाची बस रात्री अकराच्या सुमारास नगर शहरातील तारकपूर स्टॅण्डवर पोहोचली. बसला आधीच दोन तास उशीर झाला होता याबाबत प्रवाश्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान चालकाला झोप येत असल्याचे प्रवाश्यांनी पहिले. त्यानंतर बस रात्री सव्वा अकरा वाजता श्रीरामपूरकडे रवाना झाली. मात्र ड्रायव्हरला झोप काहीच आवरेना मात्र कसतरी बस राहुरी बसस्थानकात दाखल झाली.

‘Kaun Banega Crorepati 15’ मध्ये मोठा बदल होणार; बिग बींनी केलं जाहीर, पाहा नवा प्रोमो

त्यानंतर वाहकाला गाडीचं चालवणे कठीण झाल्याने त्याने बस सरळ रस्त्याच्या कडेला लावली. आपल्याला झोप येत असल्याचे त्याने कंडक्टरला सांगितले. रात्रीचा प्रवास असल्याने कंडक्टर महोदयांनी स्वतः स्टेरिंगचा ताबा. राहुरीतून बसलेल्या दोन प्रवाशांना तिकीट देखील त्यांनी स्टेरिंग वर बसूनच दिले आणि हळूहळू बस श्रीरामपूरकडे रवाना झाली. रात्री खुप उशीर झाल्यामुळे बहुतांश प्रवासी झोपेत होते. अशाही परिस्थितीत कंडक्टरने ही बस श्रीरामपुरात आणली आणि एकदाचा प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान हे सगळं सुरु असताना ड्रायव्हरने कंडक्टरकडे गाडीचे स्टेरिंग देत थेट त्याच्या बाजूच्या सीटवर लोळत बसला. मात्र अशा पद्धतीने प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गंभीर प्रकार घडल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही बस चालविणाऱ्या वाहकावर तसेच चालकाविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube