अभिमानास्पद! ‘चांद्रयान – ३’ मोहिमेत अहमदनगरच्या दोघांनी निभावली मोठी जबाबदारी

अभिमानास्पद! ‘चांद्रयान – ३’ मोहिमेत अहमदनगरच्या दोघांनी निभावली मोठी जबाबदारी

Chandrayan Mission 3 Launched : भारतासाठी आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं आहे. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली. या मोहिमेदरम्यान अहमदनगर जिल्ह्यासाठी देखील अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण जिल्ह्यातील ‘चांद्रयान – 3’ मोहिमेतअहमदनगर जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा सक्रिय सहभाग आहे, ( Ahmednagar’s two Peoples had great responsibility in Chandrayan Mission 3 Launched)

Sunil Shetty: सुनील शेट्टीने लेक अथियाला अन् जावयाला दिला दम; म्हणाला’ “इतकाही चांगला…”

राहाता तालुक्यातील राजुरी येथील असिफ महालदार यांच्या कंपनीकडे या मोहिमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, तर अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व इस्रोमध्ये कार्यरत वैज्ञानिक मयुरेश शेटे यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग आहे. आपल्या कामातून देशाचे नाव उंचावणाऱ्या या दोघांचं आमदार सत्यजित तांबे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत कौतुक केलं आहे.

Chandrayan 3 Launched : भारतासाठी ऐतिहासिक दिवस! अखेर ‘चांद्रयान-3’ झेपावलं…

काय म्हणाले आमदार सत्यजित तांबे?

जगभराचे लक्ष वेधलेल्या आणि भारतासाठी ऐतिहासिक क्षण असलेल्या ‘चांद्रयान – 3’ मोहिमेत आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा सक्रिय सहभाग आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. राहाता तालुक्यातील राजुरी येथील असिफ महालदार यांच्या कंपनीकडे या मोहिमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, तर अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व इस्रोमध्ये कार्यरत वैज्ञानिक मयुरेश शेटे यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग आहे. आपल्या कामातून देशाचे नाव उंचावणाऱ्या या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube