नगर जिल्ह्यात अजित पवारांचा दबदबा…सहापैकी चार आमदार दादांच्या गटात

  • Written By: Published:
नगर जिल्ह्यात अजित पवारांचा दबदबा…सहापैकी चार आमदार दादांच्या गटात

Nagar district…four out of six MLAs are in Dada’s group: राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत खळबळजनक अशी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, ती म्हणजे राष्ट्रवादीमध्ये बंडाची ठिणगी पडली होती. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले होते. एक गट शरद पवार यांचा तर दुसरा गट हा अजित पवार यांचा होय. त्यानंतर आमदारांची रस्सीखेच दोन्ही गटाकडून सुरु झाली. राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली. कारण आता नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी चार आमदार हे अजित पवार गटात दाखल झाले आहे. तर प्राजक्त तनपुरे व रोहित पवार हे शरद पवार यांच्या गटात आहे. (Ajit Pawar’s dominance in Nagar district…four out of six MLAs are in Dada’s group)

राष्ट्रवादीमध्ये बंड झाला आणि अजित पवार यांनी आमदारांचा एक मोठा गटाला सोबत घेत राजभवन गाठलं. त्यांनतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही गटाकडून आपल्याजवळ असलेल्या आमदारांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली. आमदारांसाठी रस्सीखेच देखील सुरु झाली. यामध्येच राष्ट्रवादीचे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्याची भूमिका देखील अत्यंत महत्वाची ठरली.

एकट्या नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहे. यामध्ये संग्राम जगताप, निलेश लंके, किरण लहामटे, आशुतोष काळे, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडाची ठिणगी पडल्यानंतर अनेक आमदारांची भूमिका स्पष्ट असल्याने त्यांनी थेट शरद पवार यांच्या बाजूने राहणे पसंत केले. यामध्ये रोहित पवार व प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे. दरम्यान किरण लहामटे यांनी देखील आपण शरद पवार यांच्याच गटात राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अवघ्या दोन दिवसांमध्येच दादांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याने लहामटे यांचे मन वळवत त्यांना अजित दादांच्या गटात सामील करून घेतले.

आशुतोष काळेंच्या निर्णयामुळे कोल्हेंची कोंडी, कोणता झेंडा हाती घेणार?

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व निलेश लंके यांची भूमिका स्पष्ट असल्याने त्याने शपथविधीपासूनच आपण अजित पवार यांच्या गटात असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान विदेशात असलेले आमदार आशुतोष काळे यांची भूमिका स्पष्ट झाली नव्हती. काळे हे कोणाच्या गटात सामील होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र अखेर आज आशुतोष काळे यांनी मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेत आपला अजित दादांच्या गटाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यामुळे आता नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा आता खऱ्या अर्थाने अजित पवारांच्या हातात आहे. तर शरद पवार यांचे विशेष लक्ष असलेल्या नगर जिल्ह्यावर त्यांना आपली पकड मजबूत करण्यासाठी पुन्हा मोठी मेहनत घ्यावी लागणार हेच सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube