Dhule Fit : धुळे मॅरेथॉन स्पर्धेत पालकमंत्री गिरीश महाजनांचा भन्नाट डान्स

  • Written By: Published:
Untitled Design (4)

धुळे : भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज आज पाहण्यास मिळाला. धुळे शहरात आज झालेल्या हिट धुळे फिट धुळे या मॅरेथॉन स्पर्धेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अंदाज मध्ये भन्नाट झुम्बा डान्स केला.

धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने हिट धुळे फिट धुळे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी झुम्बा डान्सचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी हा भन्नाट झुम्बा डान्स यावेळी केला.

त्यांचा हा झुम्बा डान्स पाहून आयोजकांसह स्पर्धकांनी हि डान्स आनंद घेतला. हिट धुळे फिट धुळे या मॅरेथॉन स्पर्धेत. धुळे शरासह जिल्ह्यातील हजारो स्पर्धक सहभागी झाले होते.

Tags

follow us