अहमदनगर शहरातील गुंडगिरी, दहशत थांबली पाहिजे; थोरातांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

अहमदनगर शहरातील गुंडगिरी, दहशत थांबली पाहिजे; थोरातांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Balasaheb Thorat On Ahmednagar Crime : अनेक वेळेस मी नगरची गुंडगिरी, वाढती दहशत या संदर्भात विधानसभेमध्ये बोललो आहे. राज्य शासनाला सुद्धा कायम सांगितले आहे की, नगरमध्ये सरकारचं, पोलिसांचं अस्तित्व दिसलं पाहिजे. येथे शांततेचा भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडतायेत. त्याबाबत मी विधानसभेत बोलताना त्याला पक्षीय स्वरूप सुद्धा दिलं नव्हतं. दुर्दैवाने अजूनही नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी आहे. तरी हेरंब कुलकर्णी यांच्या सारख्या एका मुख्याध्यापकांवर हल्ला होतो.

प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानकडून दसऱ्याचा खास संदेश; इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरुन चिंता…

यातून नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी आहे हे चित्र त्यामुळे आणखी स्पष्ट झालं आहे. ही अत्यंत निषेधार्य गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे अजून ही मला प्रशासनाला सांगायचं आहे की नगरची गुंडगिरी, दहशत ही थांबली पाहिजे, असे म्हणत पोलीस प्रशासनावर काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी ताशेरे ओढले.

प्रणिती शिंदेंच सोलापूर लोकसभेच्या उमेदवार! सुशीलकुमार शिंदेंनी दसऱ्यादिवशी केली अधिकृत घोषणा

जिल्हा शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी थोरात म्हणाले, की नगर हे जिल्ह्याचे शहर आहे. राज्यातील ही एक प्रमुख शहर आहे. इथे जे गुंडगिरीचा वातावरण वाढतं आहे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. याचा आग्रह मी विधानसभेत धरला होता. सरकार आणि पोलीस दलाच्या प्रमुखांशी ही बोललो होतो. तरी हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होतो. हे दुर्दैवी आहे.

मी कुलकर्णी यांची भेट घेणार आहे. ते दुष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध काम करणार त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हे त्यांचे काम सातत्याने राहिलेलं आहे. थोरात म्हणाले, काळे यांनी शहरातल्या प्रमुख ठिकाणी आणि विद्यालयांच्या ठिकाणी चाललेले अवैध धंदे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. नगर शहरात हे एवढं उघडपणे शैक्षणिक संस्थांच्या जवळ चालतं. विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी चालतं. ही नगरला शोभा देणारी गोष्ट नाही. प्रशासनानं अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

यावेळी कॉंग्रेसच्या विविध पदाधिकारऱ्यांसह मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चूडीवाला, प्रताप शेळके पाटील, संपतराव म्हस्के, मंगल भुजबळ, उत्कर्षा रूपवते, विलास उबाळे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, सुनील क्षेत्रे, उषाताई भगत राणीताई पंडित, सुनिता भाकरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube