‘शिंदे-फडणवीस धनगर समाजाला न्याय देतीलच’; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

‘शिंदे-फडणवीस धनगर समाजाला न्याय देतीलच’; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

Chandrashekhwar Bawankule : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला न्याय देतीलच, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhwar Bawankule) व्यक्त केला आहे. अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhwar Bawankule) उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडलीयं.

Ahmednagar Rain : नगर शहराला पावसाचा तडाखा! अनेक ठिकाणी अतिवृष्टी; जिल्ह्यातही कोसळ’धार’

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, धनगर समाजाच्या अपेक्षित मागण्या पूर्ण झाल्याचं पाहिजेत, पण धनगर समाजाच्या मागण्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत कुठलेही विषय आडवे आले तर आरक्षण परत जात असतं, त्यामुळेच आरक्षण परत जाऊ नये टिकून रहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.

रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते… राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

तसेच टिकणारं आरक्षण मिळावं, यासाठी धनगर समाजाने वाट बघितली पाहिजे, कारण खूप वर्षांपासूनच हा प्रश्न प्रलंबित असून हा प्रश्न दोन मार्गाने समाजाने प्रश्न मांडला आहे, धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे काम सुरु असून सरकारने यामध्ये लक्ष घातले आहे, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस ते योग्य ते निर्णय घेणार असल्याचंही बावनकुळेंनी यावेळी सांगितलं आहे.

Supriya Sule : अजितदादा माझे मोठे बंधू पण…, संसदेत सिंचन घोटाळ्यावर बोलल्यानंतर सुळेंचं स्पष्टीकरण

निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेताच राहणार नाही :
ज्या सरकारकडे 2025 चं बहुमत नाही, विरोधकांचे आमदार आजही आमच्याकडे येण्यास तयार आहेत, त्यांची यादी तयार असून निवडणुकीपर्यंत आमचं बहुमत 225 च्या पुढे जाणार असून निवडणुकीतनंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे अहमदनगरमधून आमचे 12 आमदार व 2 खासदार आमचे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

नार्वेकर योग्यच निर्णय घेतील :
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अत्यंत निकनाथ वकील आहेत, नियमाप्रमाणे आणि विधानमंडळाच्या ज्या काही आतापर्यंतच्या पद्धती परंपरा आहे निकाल आहेत. त्याप्रमाणे पुढे जातील खरंतर या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय लागणार, असं न्यायालयाने म्हटलंय, नार्वेकर योग्य तो निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube