नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू
अहमदनगर : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवारी ) सय्यद पिंप्री येथील गोदामात सुरू होत आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मत मोजणी प्रशिक्षणपूर्ण झाले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण एक लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात २८ टेबलवर सुरू आहे. एका टेबलावर एक तहसीलदार आणि दोन नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व मतपेट्यामधील मतपत्रिका एकत्रित करून त्यांचे एक हजाराचे गठ्ठे करण्यात येत आहेत. बाद मतपत्रिका बाजूला काढून वैध मतपत्रिकेवरून कोटा ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.