Dhangar Reservation : रुपनवर यांची प्रकृती खालावली; नगरमधून थेट पुण्याला हलवले

Dhangar Reservation : रुपनवर यांची प्रकृती खालावली; नगरमधून थेट पुण्याला हलवले

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने तसेच उपोषणे (Dhangar Reservation) सुरू झाली आहेत. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे देखील उपोषण सुरू आहे. मात्र प्रकृती खालावल्याने यामधील उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आरक्षणाच्या लढाईसाठी त्यांनी उपोषण सुरूच ठेवल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना नगर येथून आता थेट पुण्याला हलवण्यात आले आहे. यामुळे आता धनगर समाज आधिक आक्रमक झाला आहे. आरक्षणाची लढाई कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे.

गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून धनगर समाजबांधव आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषण सुरू असताना रुपनवर यांची तब्येत खालावली होती. त्यांनतर त्यांना तातडीने नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दरम्यान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उपोषणकर्ते रूपनवर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या भावना समजून घेत येत्या दोन दिवसांत याबाबत काय तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

Praful Patel with Sharad Pawar : ‘शरद पवारांसोबतचा क्षण खास’; पटेलांनी फोटो शेअर करुन व्यक्त केल्या भावना

दोन दिवस उलटले मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. याच दरम्यान रुपनवर यांची प्रकृती खालावत चालली. तसेच त्यांनी प्राणत्याग करणार असा इशारा देखील दिला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती आणखीच खालावल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. तर चौंडी यथील आणखी एक उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची प्रकृतीही खालावल्याचे सांगण्यात आले.

खंबाटकी घाटात रास्तारोको करणार

समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप देखील उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. मात्र आता काही झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. तसेच केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनामध्ये वटहुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे, तसेच या सरकारला जाग आणण्यासाठी आज बुधवारी खंबाटकी घाटामध्ये राज्यभरातून सर्व धनगर समाज बांधव एकत्र येऊन त्याठिकाणी रस्तारोको आंदोलन करणार आहेत. या घडामोडींवरून आता धनगर आरक्षणाचे आंदोलनही वाढत चालल्याचे दिसून येत आहे. या प्रश्नावर अद्याप समाधानकारक निर्णय झालेला नाही.

Lok Sabha Election : जाधव लोकसभेच्या रिंगणात; मंत्री कराडांना आव्हान देत ठोकला शड्डू!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube