बापूराव कराळे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 04 29 At 6.33.54 PM

पाथर्डी तालुक्यातील जोडमोहज येथील रहिवासी व नानवीज येथील राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र येथे कार्यरत असलेले हवालदार बापुराव उत्तम कराळे यांना उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल यावर्षी पोलीस महासंचालकाचे पदक जाहीर झाले आहे.

1 मे ला महाराष्ट्र दिनी त्यांना पदक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. प्रशासकीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक रणजीत सेठ यांनी हे पदक जाहीर केले आहे. बापूराव कराळे हे 2006 साली  राज्य राखीव पोलीस दलात रुजू झाले होते.

त्यांचे मोठे बंधु बाबासाहेब कराळे जोडमोहोज गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. 1 मे ला नानवीज येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर पोलीस अधीक्षक रामचंद केंडे यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. या पदकाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags

follow us