आष्टीत जीवघेणा हल्ला प्रकरण; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाला पोलिसांकडून अटक…
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबूशेट टायरवाले यांना पोलिसांनी अटक केलीयं.
Babushet Tyrewale : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी, जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले उर्फ बाबू सुब्रमण्यम यांना बीड जिल्हा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या खटल्यात टायरवाले कोर्टात हजर राहत नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली व न्यायालयात हजर केले.
नगर अर्बन बँक घोटाळा आरोपींच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय; ठेवीदारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा
टायरवाले यांच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. ते सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मूळ शिवसेना रुजविण्यात, वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.या प्रकरणातील इतर 11 संशयित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. तेव्हापासून बाबू टायरवाले हा पोलिसांना चकवा देत पसार होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील पवन उर्जा प्रकल्पावर काम करणारे अनिल प्रभाकर म्हस्के यांच्यावर पगाराच्या वादातून 2016 साली 12 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात 12 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंढे पुन्हा कुणाला खटकले?, प्रशासकीय सेवेतील 24 वा बदली आदेश निघाला
घटनेनंतर पोलिसांनी 11 संशयित आरोपींना अटक केली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. दरम्यान, मुख्य संशयित बाबू टायरवाले हा गेल्या काही वर्षांपासून पसार होता. अंभोरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत मंगळवारी त्याला अटक केली. त्याला सायंकाळी आष्टी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंभोरा पोलिसांकडून सुरू आहे.