जामखेडमध्ये फायरबॉल गोडाऊनला आग, दोन जणांचा होरपळून मृत्यू

जामखेडमध्ये फायरबॉल गोडाऊनला आग, दोन जणांचा होरपळून मृत्यू

Ahmednagar news : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात (Jamkhed news) फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागून दोन जणांचा होरपळून झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जामखेड-नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर चंद्रकांत भोडवे (45) घोडेगाव, ता. जामखेड व जहीर सत्तार मुलानी (35) तेरखेडा. ता कळंब या दोघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जामखेड येथील नगररोडवरील सावळेश्वर ट्रॉक्टरच्या मागील बाजूस पंकज शेळके यांचे रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटरचे उत्पादन करणयाचे गोडाऊन आहे. या आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊनमध्ये आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

Kishor Aaware murder case : किशोर आवारे खून प्रकरणी मोठी अपडेट, चौघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी

यानंतर जेसीबीच्या सहाय्याने या गोडाऊनला पाठीमागील बाजूस भगदाड पाडण्यात आले. फायरबॉलचे स्फोट होत असल्याने आणि धुराचे प्रचंड लोळ येत असल्याने गोडाऊनमध्ये कोणालाही जाता आले नाही. यानंतर जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला तातडीने बोलवण्यात आले पण दिडी तासाने आग आटोक्यात आली. तोपर्यंत ज्ञानेश्वर भोंडवे आणि जहीर मुलानी यांचा मृत्यू झाला होता. तर गणेश पवार आणि पुजा पठाडे हे दोघे जण जखमी झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube