गणेश कारखाना मतमोजणीत चुरस; कोल्हे- थोरात गटाच्या दोन जागा आघाडीवर, विखे गटाने एक जागा जिंकली

गणेश कारखाना मतमोजणीत चुरस; कोल्हे- थोरात गटाच्या दोन जागा आघाडीवर, विखे गटाने एक जागा जिंकली

Ganesh Sugar Mill Result :  गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे राहता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आज सकाळी राहता तहसील येथे मतमोजणीसाठी सुरुवात झाली, असून मतमोजणीसाठी 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. ( Radhakrishna Vikhe Vs Vivek Kolhe and Balasaheb Thorat ) ब वर्गातील विखे गटाचे ज्ञानदेव बाजीराव चोळके १५ मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी कोल्हे गटाचे सुधाकर जाधव यांचा पराभव केला. चोळके यांना ४४ मते पडले असून जाधव यांना २९ मते मिळाली. यात एकूण 73 मतांपैकी दोन मते बाद झाली आहे.

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा धगधगता इतिहास…

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत थोरात – कोल्हे गटाचे शिर्डी गटातील उमेदवार बाबासाहेब दादा डांगे ३८५९ व विजय भानुदास दंडवते ३ हजार ७८६ हे दोघे पहिल्या फेरीत ६५० ते ७०० मतांनी आघाडीवर आहेत. विखे पाटील गटाचे बाबासाहेब रामभाऊ डांगे यांना ३१५९ व बाबासाहेब परसराम मते यांना ३ हजार २७ मते मिळाली असून  शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शिंदे यांना  अवघी मते ४२ मिळाली आहे.

Ayodhya Poul News : कोण आहेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ?

दरम्यान, गणेश कारखान्याच्या निवडणुकीसाठी विखेंच्या विरोधात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पॅनेल उभे केले होते. विशेष म्हणजे विखे पाटील आणि कोल्हे हे दोन्ही सध्या भाजपमध्येच आहेत. तरी सुद्धा कारखान्याच्या निवडणुकीसाठी हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube