जीएस महानगर बँकेच्या निवडणुकीत सासूला धोबीपछाड देत सून ठरली किंगमेकर…

अहिल्यानगर – जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (GS Mahanagar Co-operative Bank) २०२५ च्या संचालक मंडळ निवडणुकीत गीतांजली उदयराव शेळके (Geetanjali Udayrao Shelke) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने ८० टक्के मते मिळवून विरोधी पॅनेलच्या सुमनताई शेळके (Sumantai Shelke) यांच्या गटाचा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे ही निवडणूक सासू विरोधात सून अशी होती. या निवडणुकीत सुनेनं आपल्याच सासूला धोबीपछाड देत निवडणुकीत बाजी मारली.
सत्यजित तांबेंचं बोलणं बालिशपणाचं…; बाळासाहेब थोरातांनी टोचले कान
गीतांजली उदयराव शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १८ जागांवर विजय मिळवला, ज्यामध्ये एक जागा बिनविरोध निवडून आली होती. गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने सर्व मतदारसंघांमध्ये ८० टक्के मते मिळवली, तर सुमनताई शेळके यांच्या पॅनेलला केवळ २० टक्के मते मिळाली. ही एकतर्फी विजयाने गीतांजली शेळके यांच्यावरील भागधारकांचा विश्वास अधोरेखित झाला.
सासू – सुनेची जोडी निवडणुकीच्या रिंगणात
पारनेर तालुक्यातील मुंबईस्थित विशेषत: व्यावसायिकांना एकत्र करून सॉलीसिटर दिवंगत गुलाबराव शेळके यांनी या बॅकेचे रोपटे लावले. सुरुवातीपासून शेळके यांचेच या बँकेवर वर्चस्व राहिले. पुढे त्यांच्या निधनानंतर बॅंकेची सुत्रे त्यांचे चिरंजीव अँड. उदय शेळके यांच्याकडे आली. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली पहिलीच निवडणूक बिनविरोध केली होती. मात्र कालांतराने उदय यांचे देखील निधन झाले व दोघांच्या पश्चात प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सुमन व स्मिता शेळके, तसेच (कै.) उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली. गीतांजली यांच्या पॅनेलने ८० टक्के मते मिळवून सुमनताई यांच्या पॅनेलचा पराभव केला. ही लढाई केवळ राजकीय नव्हे, तर कौटुंबिक पातळीवरही लक्षवेधी ठरली.
मंत्री संजय शिरसाटांचा विट्स हॉटेल खरेदीबद्दल मोठा निर्णय; वाचा, कुठं अन् कसं आहे हे हॉटेलं?
हे आहेत विजयी उमेदवार
गीतांजली शेळके, आडसूळ सचिन सीताराम, ढोले रविंद्र दत्तात्रय, गुंजाळ गणेश सावकार, कवाद भास्कर बाबाजी, खणकर सतीश अनंत, खोसे कुंदा भास्कर, खोसे मंगेश नारायण, कोठावळे श्रीधर कोंडीराम, लंके बबन भाऊ, पठारे संतोष किसन, शिंदे शंकर पांडुरंग, शिंदे पांडुरंग विष्णू आणि थोरात मंगलदास भाऊसाहेब विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघात गीतांजली शेळके आणि वाढवणे छाया रामदास यांनी विजय मिळवला.
इतर मागास मतदारसंघात थोरात भिवाजी भागुजी, भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघात पालवे विलास दगडू आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात संतोष भाऊराव रणदिवे (बिनविरोध) विजयी झाले.