मंत्री संजय शिरसाटांचा विट्स हॉटेल खरेदीबद्दल मोठा निर्णय; वाचा, कुठं अन् कसं आहे हे हॉटेलं?

Sanjay Shirsat and vits Hotel : सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचाच्या मुलाकडून या हॉटेलच्या खरेदीचा प्रयत्न सुरू होता. तब्बल 67 कोटी रुपयांना हे हॉटेल (Hotel) खरेदी करण्यात येणारं होतं. मात्र, विरोधकांकडून होणाऱ्या टिकेनंतर हा वाद वाढल्याने मंत्री शिरसाट आता बाहेर पडलेले आहेत. शिरसाट यांनी तशी घोषणा केली आहे.
मुख्य परिसरात हॉटेल
यामुळे राज्यभरात या विट्स हॉटेलबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. संभाजीनगर शहरातल्या क्रांतीचौकसारख्या मुख्य परिसरात बरेच 5 स्टार हॉटेल आहेत. याच परिसरात हे आलीशान विट्स हॉटेल देखील आहे. खरेदी व्यवहारामुळे चर्चेत आलेलं हे हॉटेल नेमकं कसं आहे? याचा आढावा टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने घेतला आहे.
अजितदादा काय आकाशातून पैसे आणणार आहे का? हसन मुश्रीफांनी संजय शिरसाटांना चांगलंच सुनावलं
शहरातील क्रांती चौकात हे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करतानाच काचाचे सुसज्य प्रवेशद्वार आहे. यामध्ये पावरलेली फर्शीही फार महागडी आहे. त्यानंतर दुसरा तीसरा आणि चौथा फ्लोअरही असाच महागड्या वस्तुनी सदवलेला आहे. तसंच, आतमध्ये जवेणासाठी आणि कॉफीसाठी हॉल आहेत. दुसऱ्या मजल्यावरही ओपन स्पेस ठेऊन खालचा सर्व व्हिव दिसतो. या हॉटेलमध्ये १०० खोल्या असल्याचं सांगितलं जातय.
..तर तब्बल 20 लाख दंड
संजय शिरसाट यांच्या दाव्यानुसार ते आता हे हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडणार आहेत. जर त्यांनी माघार घेतली तर तर त्यांना तब्बल 20 लाखांचा भुर्दंड बसेल. कारण या हॉटेलच्या लिलावाच्या वेळी सहभागी होण्याआधीची अट अशी होती की, हे हॉटेल खरेदी करणाऱ्यांनी 25 टक्के रक्कम लिलावाच्या एक महिन्यात आणि 75 टक्के रक्कम लिलावानंतर तीन महिन्यात देणं बंधनकारक होतं. जर असं केलं नाही तर अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, असा नियम आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे एसटीएम व्यंकट राठोड यांनी दिली आहे. आता संजय शिरसाट नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.