Video: टक्केवारी आमदार म्हणत मोनिका राजळेंना डिवचल; हर्षदा काकडेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकलं

  • Written By: Published:
Video: टक्केवारी आमदार म्हणत मोनिका राजळेंना डिवचल; हर्षदा काकडेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकलं

Shevgaon Pathardi Assembly Election : गेले अनेक वर्ष शेवगाव पाथर्डी मतदारसंघावरून नेवासाच्या लोकांनी राज्य केलं आहे. हे राज्य आपल्याला आता मोडून काढायचं आहे. या लोकांनी कधीही शेवगाव पाथर्डीच्या जनतेचा विचार केला नाही. यापूर्वीच पाथर्डीचा आमदार झाला, तर त्यांनी केवळ पाथर्डीचाच विकास केला. मात्र शेवगाव पाथर्डी आजही वंचितच आहे असा आरोप हर्षदा काकडे यांनी विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावर केला. त्या ‘संकल्प विजयाचा’ या आयोजित मेळाव्यात बोलत होत्या.

लढा साखर सम्राटांच्या विरोधातील लढा

शेवगाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दोन्ही तालुक्यांचा विकास  थांबला आहे.  त्याला कारणीभूत कार्यसम्राट आमदार यांनी प्रश्न सोडवलेच नाही अशा शब्दात हर्षदा काकडे यांनी विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसंच आजपर्यंत  जे जे शब्द दिले ते कामं आम्ही पूर्ण केल आहे.  जो शब्द आम्ही देतो तो शब्द आम्ही पाळतो, आपला हा लढा साखर सम्राटांच्या विरोधात आहे असं देखील यावेळी काकडे म्हणाल्या आहेत.

Video: हर्षवर्धन पाटील क्षमता असलेला नेता; त्यांचा  तो निर्णय चुकला, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

प्रत्येक विकास कामांमध्ये टक्केवारी घेतल्यामुळे कार्यसम्राट आमदारांकडून कोणताही विकास मतदार संघात झाली नाही. आज मतदार संघात कोणतीही कामे टक्केवारी शिवाय होत नसल्याने नागरिक विकास कामांपासून वंचित राहिल्याचा थेट आरोपच त्यांनी यावेळी केला आहे. आज आजी-माजी आमदारांनी एक साधी एमआयडीसी आपल्या मतदारसंघात आणली नाही. रोजगाराची उपलब्धता न होता किंवा ही लोक आपल्या कारखान्यांमध्ये ऊस तोडायला आली पाहिजे असं या साखर सम्राटांना वाटतं असंही त्या म्हणाल्या आहेत.

जनतेच्या विकासासाठी आमदार

रस्ता पाणी आणि वीज या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु, यांच्याकडून त्याचीही पूर्तता झाली नाही. त्यामुळे मी आमदार झाल्यावर या  प्रमुख प्रश्नांची माझ्यासाठी प्रथामिकता असणार आहे असा  शब्दही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. हर्षदा काकडे यांनी कधीही घुले राजळे यांच्या कामाचं उद्घाटन केलं नाही. मात्र, हे भामटे आमच्या विकास कामांचं उद्घाटन करत आहेत. निवडून आले तरी ते कधी मतदारसंघात नाहीत. ते पुणे मुंबई असेच फिरत असतात. मला टक्केवारी घ्यायला आमदार बनवायचं नाही तर जनतेच्या विकासासाठी मला आमदार व्हायचंय अशा शब्दात काकडे यांनी राजळे यांच्या वरती जोरदार टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube