Ahmednagar News : औरंगजेबाच्या पोस्टर वादादरम्यान अहमदनगरमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य; वारकऱ्यांसाठी…

Ahmednagar News : औरंगजेबाच्या पोस्टर वादादरम्यान अहमदनगरमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य; वारकऱ्यांसाठी…

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकावण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली होती. मात्र या दरम्यान अहमदनगरमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन झाल्याचं पाहायला मिळालं. ( Hindu-Muslim Unity in Ahmednagar after Auragjeb Poster Crises )

औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्या प्रकरणी उद्या भिंगार बं

मोर्चे, आंदोलनातील भडकाऊ भाषण व समाज माध्यमांवर तेढ निर्माण करणारे संदेश पसरविल्याने जातीय तणावाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत असताना अहमदनगर शहरात धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविणारे एक आगळे-वेगळे चित्र पहावयास मिळाले. मुस्लिम समाजातील हाजी करीमशेठ हुंडेकरी यांनी नाशिकहून पंढरपूरला सायकलवर जाणार्‍या हिंदू वारकऱ्यांचं मनोभावे स्वागत केले.

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूर सायकल वारी काढण्यात येते. ही सायकल दिंडी सुरु झाल्यापासून हुंडेकरी परिवाराच्या वतीने दरवर्षी स्वागत केले जात असून, स्वागत करण्याचे हे त्यांचे अकरावे वर्ष आहे. पर्यावरण संवर्धन व आरोग्याचा जागर करीत निघालेल्या या सायकल दिंडीत सुमारे तीनशे पेक्षा जास्त वारकरी सहभागी असतात.

धमकीनंतर अहमदनगर येथील औरंगजेब मदरशाला पोलिस संरक्षण

दरवर्षी शहरातील हुंडेकरी लॉन त्यांच्या स्वागतासाठी खुले ठेवले जाते. या सोहळ्यासाठी लग्नाची तारीख देखील घेतली जात नाही. तर तो दिवस फक्त या वारकरींसाठी राखीव ठेवला जातो. या वारीचा पहिला मुक्काम शहरातील हुंडेकरी लॉनमध्ये असतो. यामध्ये सर्व सायकलपटू वारकऱ्यांच्या राहण्यापासून ते नाष्टा व जेवणाची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते.

ढोल पथकाच्या गजरात या वारीचे स्वागत करण्यात आले. सायकलीवर प्रदुषण मुक्ती, पर्यावरण रक्षण व निरोगी आरोग्याचे संदेश देणारे फलक लावण्यात आलेले होते. वारीत रथामध्ये असलेली पांडूरंगाची पूर्ण कृती पुतळा सर्वांचे लक्ष वेधले. एकामागे एक मोठ्या शिस्तीत या वारी शहरात दाखल झाली होती.

दरम्यान किशोर माने यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा प्रचार प्रसार करीत दरवर्षी या सायकलवारीच्या आयोजन केले जाते. हुंडेकरी यांनी नेहमीच सर्वधर्म समभाव जोपासत मागील अकरा वर्षापासून या वारीतील वारकर्‍यांची सेवा केली आहे. पंढरपूरला जाताना विविध भागातून सायकलपटू या वारीत जोडले जाणार असून, तर विविध ठिकाणाहून पंढरपूरला सायकलने आलेल्या साडेतीन हजार सायकलिस्ट रिंगण सोहळा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube