आता अमळनेरमध्येही किरकोळ कारणावरून दगडफेकीची घटना, 32 जणांना अटक

आता अमळनेरमध्येही किरकोळ कारणावरून दगडफेकीची घटना, 32 जणांना अटक

Stone pelting Amalner : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक शहरात दंगली झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये औरंगजेबचा (Aurangzeb) फोटो स्टेट्सला ठेवल्यानं राज्याच्या बहुतांश भागात तणावाचे वातावरण आहे. अशातच आता जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातील दगडी गेट परिसरातही दोन गटात दगडफेकीची घटना (Stone pelting incident) घडली आहे. या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी 32 जणांना ताब्यात घेतलं असून सध्या शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. (In Amalner town of Jalgaon district, stone pelting, a minor quarrel turned into a Stone pelting)

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील जिंजरगल्ली, जुना पारधी वाडा, सराफ बाजार परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजता दोन गटांत जोरदार दगडफेक झाली. किरकोळ कारणावरून दोन ते तीन तरुणांमध्ये झालेल्या वादाचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले आणि या वादातून दोन गटात दगडफेक झाली. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून तीन ते चार नागरिकही जखमी झालेत. या घटनेने परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Ajit Pawar यांनी ‘तो’ प्रस्ताव दिल्याने सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष झाल्या; वंदना चव्हाणांचा गौप्यस्फोट

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, एपीआय राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यांनं वातावरण निवळलं. दरम्यान, या दगडफेकीच्या घटनेत तीन पोलिस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती पोलिसांनी वरिष्ठांना दिल्यानंतर अतिरिक्त कुमक जळगावहून मागवली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. यावेळी एलसीबीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या32 तरुणांना अटक केली.

रात्री दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी अमळनेर शहरात कलम 144 अन्वये संचारबंदी लागू केली आहे. आज दि.10 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते दि 12 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube