रोहित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक; जामखेड बंदची दिली हाक

अहमदनगर – कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे ) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुणे जिल्ह्यातून सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी युवांच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन देण्यास विधान भावनावर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले व यावेळी पोलीस व युवांमध्ये संघर्ष देखील झाला. पोलिसांनी (Police) यावेळी रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान प्रशासनाच्या या हुकूमशाहीचा निषेध म्हणून व रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आज जामखेड बंदची (Jamkhed Off) हाक देण्यात आली.
Parliament : देशाच्या संसदेवर ‘गॅस’अॅटॅक? सभागृहात धुरच धुर करणारा ‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यांच्या युवा संघर्ष यात्रेला गालबोट लागलं आहे. उपराजधानी नागपुरात युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला. या समारोपाला महाविकास आघाडीचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमातून संजय राऊतांसह इतर नेत्यांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली. त्यानंतर ही संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते थेट विधानभवनाकडे निघाल्याने मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी रोखलं मात्र, पोलिसांनाही कार्यकर्त्यांना न जुमानल्याचं पाहायला मिळालं आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांसह रोहित पवार यांनाही ताब्यात घेतलं आहे.
पुन्हा चुकला काळजाचा ठोका! संसदेत घुसलेल्या तिघांमुळे 21 वर्षांपूर्वीच्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या
युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट विधानभवनावर धडक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून पुढं आल्याचं दिसून आलं आहे. याचदरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
सरकारच्या आदेशानेच हा प्रकार झाल्याचे रोहित पवार म्हणाले. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध म्हणून आज बुधवारी राष्ट्रवादीने जामखेड बंदची हाक दिली आहे. नागपूर इथे घडलेल्या प्रकाराचा जामखेड राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, प्रकाश सदाफ, विजय गोलेकर आदींनी निषेध करत बंदमध्ये सहभागी होण्याचं आव्हान केलं आहे.