कर्जत-जामखेड एमआयडीसीचा प्रश्न थेट पंतप्रधानांच्या दारी, आमदार रोहित पवारांचं थेट पत्र

कर्जत-जामखेड एमआयडीसीचा प्रश्न थेट पंतप्रधानांच्या दारी, आमदार रोहित पवारांचं थेट पत्र

Mla Rohit Pawar : मागील अनेक दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या कर्जत-जामखेड एमआयडीसी प्रश्नावर विधानसभेत मोठा गदारोळ झाला. हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला पाहिजे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी उपोषण तसेच उद्योगमंत्र्यांची भेट देखील घेतली. मात्र, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे. आता खुद्द आमदार पवार यांनी या प्रश्नी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाची गुंडगिरी; बंदुकीच्या धाकावर अपहरण करत व्यावसायिकाला मारहाण

रोहित पवारांनी केले ट्विट :
‘माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीला सातत्याने पाठपुरावा करूनही अंतिम मंजुरी मिळत नाहीये, शिवाय अधिवेशनातही मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य सरकार याबाबतीत उदासीन असल्याचं पाहायला मिळत आहे. वारंवार विनंती व स्मरणपत्र देऊनही निर्णय होत नसल्याने अखेर माझ्या मतदारसंघातील सर्व युवा व नागरिकांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एमआयडीसी मंजुरीबाबत आपण शासनाला निर्देश द्यावे, अशी विनंती केली’

Ambika Sarkar : ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांचं निधन!

रोहित पवारांच्या या पत्रावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा हा अनेक दिवसांपासून चांगलाच तापला आहे. या मंजुरीसाठी आमदार रोहित पवार हे देखील विधान भवन परिसरात आंदोलनाला बसले होते. नंतर काही युवकांनी उद्योगमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून विनंती केली होती.

पत्रात काय म्हंटले आहे?
आमदार रोहित पवार यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हंटले, ‘मी माझ्या मतदार संघात एमआयडीसी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारकडून जाणीवपूर्वक मला विरोध केला जात आहे. याबाबत मी अधिवेशनात आंदोलन केले. विधानसभेत मुद्दा देखील उपस्थित केला. माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही म्हणता सबका साथ सबका विकास मग हे महाराष्ट्रात का नाही?’

‘माझ्या मतदार संघातील युवकांना रोजगारांपासून का वंचित ठेवले जात आहे. महसूलमध्ये सर्वाधिक अग्रेसर महाराष्ट्र आहे. देशाच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्राचे भरीव योगदान आहे. हि एमआयडीसी मजूर झाल्यास मतदार संघातील तरुणांना रोजगार मिळेल. त्यांना नौकरीसाठी दूर जावे लागणार नाही. मी गेल्या तीन वर्षांपासून या मुद्द्यासाठी लढतो आहे. मात्र सरकारकडून अपेक्षित असे सहकार्य मला लाभत नाही आहे’, अशी खंत आमदार रोहित पवार यांनी मोदींना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube