कृषी विभागाचा दणका! तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; कारणे दाखवा नोटीसाही बजावल्या
Ahmednagar News : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नगर जिल्हा कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत भरारी पथके आहेत. या पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जादा दराने निविष्टा विक्री करणे, खताची लिकिंग, बोगस खते व बी-बियाणे, साठा पुस्तके, खरेदी-विक्री व्यवहार नोंद वही, विक्री परवाने आदी कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित कृषी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल आहेत. त्यानुसार तपासणी करून कारवाई केली जात आहे. (Ahmednagar Agriculture Department suspended three Licence)
Ahmednagar : सुजय विखे पाटलांविरोधात कोण? राष्ट्रवादीकडे एक नाही तर ‘सहा’ पर्याय
भरारी पथकांमार्फत सुरू असलेल्या तपासणीत राहुरी, नेवासे, पारनेर येथील प्रत्येकी 1 कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित केला आहे. काही केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर 1 तक्रार निवारण कक्ष कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी 10 ते सायंकाळी 6.15 पर्यंत सुरू असेल. फसवणूक झाल्यास या वेळेत ते तक्रार करू शकतात, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी खरेदी-विक्री, पक्की बिले घेणे, घेतलेल्या बियाण्यांचा टॅग जपून ठेवले, बियाण्यांचा सॅम्पल काढून ठेवणे आदी बाबींची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. फसवणूक झाल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात उत्कृष्ट बियाणे, निविष्टा योग्य दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी केलेली आहे.
चिंता वाढली, चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जूनअखेर पुन्हा येणार कोरोनाची लाट