Lumpy चा विळखा घट्ट! नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणचा बाजार बंद

Lumpy Disease : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात लम्पी (Lumpy Disease) हा जनावरांना होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील आता यावर कठोर पाऊले उचलली आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनावरांचा बाजार बंद करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार नुकताच शेवगाव तालुक्यात रविवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद ठेवणायचे आदेश प्रशासनाने दिले आहे. (दि.27) आजपासून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांनी दिली.
नगर जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराने पुन्हा शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लम्पी या जनावरांच्या साथरोगाचा संसर्ग वाढला आहे. अनेक तालुके हे लम्पीबाधित होत असल्याने आता प्रशासनाने उपाययोजना म्हणून तसेच या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
नगरकरांसाठी खुशखबर! पाइपलाइनद्वारे घरपोहच मिळणार गॅस
धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आजअखेर जवळपास 500 जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. तसेच संपूर्ण अहमदनगर जिल्हा बाधित क्षेत्र व सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
‘BRS’ चा भाजपला दणका! सोलापुरात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत धरली हैदराबादची वाट
लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?
या आजारात जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते.
लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो.
जनावरे चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
हळूहळू डोके, मान, या भागांवर गाठी येतात.
डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
पायावर तसेच कानामागे सूज येते.
जनावरे दूध कमी देतात.