नगरच्या नामांतरचे क्रेडिट कोणाला? रोहित पवार म्हणाले, नामांतराचे खरे श्रेय…

नगरच्या नामांतरचे क्रेडिट कोणाला? रोहित पवार म्हणाले, नामांतराचे खरे श्रेय…

Rohit Pawar : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. नामांतराचे क्रेडिट घेणाऱ्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फटकारले आहे.

पवार म्हणाले, या नामांतराचे श्रेय कोणत्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षाने घेऊ नये. यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत. नामांतराचे खरे श्रेय हे जनतेचे आहे. पवार यांनी आज नगर शहरातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.

राष्ट्रवादीकडून जिल्हा विभाजनाला धार! जगताप म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा…

ते म्हणाले, राज्य सरकारने नगरचे नाव अहिल्यादेवी होळकर0 नगर करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. कोणताही जातीय धार्मिक भेदभाव न बाळगता सामान्यांच्या हितासाठी पुण्यश्लो अहिल्यादेवी होळकर यांनी काम केले. जिल्ह्याचे नाव हे त्यांच्या नावाने दिले जात असेल तर त्याचे स्वागत आहे. पण, याचे श्रेय कोणत्या एका व्यक्तीने किंवा पक्षाने घेऊ नये.

चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सरकराने काहीच नियोजन केले नव्हते. या कार्यक्रमात अनेक उणिवा राहिल्या. त्या ठिकाणी आम्ही स्वतः जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली. तसेच डॉक्टरांचीही व्यवस्था केली, असे रोहित पवार म्हणाले.

Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादीची डोकेदुखी? काँग्रेसने अहमदनगरवर दावा ठोकला !

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला. नगर जिल्ह्याच्या नामांतराच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आ. जगताप म्हणाले, नामांतराच्या निर्णयाचं स्वागतच आहे. याबद्दल आनंद झाला. पण, नामांतराबरोबरच मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा निर्णय जाहीर केला असता तर हाच आनंद द्विगुणित झाला असता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube