‘भावी मुख्यमंत्र्यांना आमदारकी तरी मिळेल का?’ बॅनरबाजीवर कर्डिलेंचा थोरातांना खोचक टोला

‘भावी मुख्यमंत्र्यांना आमदारकी तरी मिळेल का?’ बॅनरबाजीवर कर्डिलेंचा थोरातांना खोचक टोला

Ahmednagar Politics : महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. नेतमंडळी काही बोलत नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र ठिकठिकाणी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. नेत्यांकडून या प्रकारांवर फारसे काही बोलले जात नाही. आता हे लोण नगर जिल्ह्यात येऊन ठेपले आहे. काही दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कार्यकर्त्यांनी असाच फलक लावला होता. त्यांच्या या फलकावरून आधी खासदार सुजय विखे आणि आता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी थोरातांना खोचक टोला लगावला.

LetsUpp Poll : अजितदादाच फेव्हरेट ! प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक पसंती, मुंडे, भुजबळ कितव्या स्थानावर ?

ज्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकत आहे ते परत आमदार म्हणून तरी निवडून येतील की नाही याची खात्री त्यांना नाही. म्हणून अशी स्टंटबाजी करून काही तरी मते आपल्याला मिळतील यासाठी हे सगळं सुरू असल्याचे कर्डिले म्हणाले. कर्डिले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच भावी मुख्यमंत्री म्हणून झळकत असलेले नेत्यांच्या बॅनरबाजीवर मत व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षातील आजी माजी पदाधिकाऱ्यांसाठी नगर शहरातील आम्रपाली गार्डन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ज्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर तसेच पोस्टर लागले आहे तर पुन्हा एकदा निवडून येतील की नाही याची खात्री नाही. म्हणून ते मुख्यमंत्री म्हणून आपली घोषणा करायची व असे करून आपल्याला काही मत मिळतील का व आपण पुन्हा एकदा आमदार होऊ की काय एवढ्यासाठी हे स्वप्न पाहण्याचे काम या नेत्यांकडून सुरू आहे.

बाळासाहेब थोरातांचा ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर; सुजय विखेंचा सणसणीत टोला…

आता दहा जरा थांबा होतील 50 मुख्यमंत्री

महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकत आहे. यावर बोलताना कर्डिले म्हणाले, आज घडीला तरी यांचे केवळ 10 भावी मुख्यमंत्री दिसत आहे. मात्र विधानसभा निवडणुका आल्या की यांचे जवळपास 50 भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकतील. असे येत्या काळात दिसून येत की काय असे चित्र दिसते, अशा शब्दात कर्डिले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube