‘औटींनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली’; सुजय विखेंचा घणाघात
Sujay Vikhe : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली तर दुसरीकडे विजय औटी (Vijay Auti) यांनी देखील येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केली.
पारनेर येथील मनकर्णिका लॉन्स येथे आयोजित करण्यात आयोजित जनसेवा पॅनलच्या प्रचार सभेत विखे यांनी आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे ,वसंत चेडे, राहुल शिंदे , भाजप तालुकाध्यक्ष सुनील थोरात,बंडू रोखले, माजी सभापती गणेश शेळके आदी उपस्थित होते.
भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर
ते पुढे म्हणाले, चोर, गुंड, दरोडेखोर म्हणणाऱ्यांची युती एका रात्रीत झालेली नाही. ही खलबतं सहा महिन्यांपासून सुरू होती. हा संघर्ष गरीब लोकांसाठी उभा केलेला आहे. तालुक्याचा विकास जो मागील तीन वर्षात वाळू तस्कर, गुंड , मटका किंग यांचा दावणीला बांधला होता तो तुमच्या पायाशी लोळण घालाण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने प्रयत्न करू
आम्ही सत्तेत येताच जी दहशत होती तिचा बीमोड करण्याचे काम केले, कोणाचाही मुलाहिजा आम्ही बाळगला नाही, आता या तालुक्यातील जनतेला विचार करण्याची वेळ आली आहे, की ज्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू आणले त्यांच्या सोबत जायचे की जे तुमचे भविष्य घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांच्या सोबत जायचे.
फडणवीस भावी मुख्यमंत्री ! बॅनर झळकल्यानंतर फडणवीस म्हणाले, अतिउत्साही लोकांनी..
या प्रचार सभेतून उपस्थित मतदारांना जनसेवा सहकारी पॅनला निवडून देण्याचे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले. या प्रचार सभेस ऋषी गंधाडे, युवराज पठारे,भाऊ ठुबे, बंडू रोखले, सचिन वराळ, अश्विनी थोरात तसेच भाजपा शिवसेना शिंदे गट पदाधिकारी, चेअरमन, व्हा चेअरमन , संचालक वि.का.सो , सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी , हमाल मापडी, मतदार, शेतकरी सभासद आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.