उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ भूमिकेवर विखे पाटील बोलले; म्हणाले, बारसूला विनाकारण..
Radhakrishna Vikhe on Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बारसूचा दौरा केला. येथे त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना येथे सभा घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मंत्री विखे यांनी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, नाणारच्या वेळी त्यांची भूमिका वेगळी होती, आता वेगळी भूमिका आहे. त्यांची भूमिका नेहमीच बदलत असते. मात्र स्थानिकांच्या काय भावना आहेत सरकार त्यांच्याशी चर्चा करत आहे. बारसू प्रकरणाला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रकार होत असल्याचे विखे म्हणाले.
Sharad Pawar : पक्षातील बंडाळीवर राजीनामा नाट्य, पवारांच्या राजीनामा मागे घेण्यावर शिरसाटांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयावरही विखे यांनी भाष्य केले. सवयीप्रमाणे त्यांनी शब्द फिरवला असे विखे पाटील म्हणाले. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पवार साहेबांनी म्हटलं होतं की भाकर फिरवली पाहिजे. मात्र त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे निर्णय फिरवला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक; अहमदनगरच्या काँग्रेस कार्यालयाला पोलिसांचा पहारा
उद्धव ठाकरेंचा विकासविरोधी चेहरा
उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) विकास विरोधी चेहरा आता बाहेर आला आहे. त्यांना बारसू येथील जनतेशी काही देणेघेणे नाही. विकासाशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे त्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. आता त्यांना बारसूतील लोकांचा खांदा मिळाला आहे, अशी टीका काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.