अजितदादांसाठी मोदी सरकारच उत्तम माध्यम; शिंदे गटाच्या मंत्र्याची खुली ऑफर

अजितदादांसाठी मोदी सरकारच उत्तम माध्यम; शिंदे गटाच्या मंत्र्याची खुली ऑफर

Dipak Kesarkar offers Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र, आता पुन्हा राज्य सरकारमधील मंत्र्यांनेच त्यांना ऑफर दिली आहे.

अजित पवार यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नयेत. संजय राऊतांसारखे लोक रोज बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष देत नाही. मात्र, अजितदादा जेव्हा बोलतात नागरिक त्याला गांभीर्याने घेतात. सामाजिक ऐक्य राखण्याच्या कामात दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे असे स्पष्ट करत दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावे. अजित पवार यांच्या कार्यक्षमतेसाठी मोदी सरकार हेच माध्यम आहे, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी केले.

इंदुरीकर महाराजांचे पुढचे किर्तन तुरुंगात? औरंगाबाद उच्च न्यायालयाचा मोठा दणका

केसरकर आज शिर्डीत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. केंद्रात आमच्या गटालाही मंत्रिपदे मिळतील याची खात्री आहे. तेथे काही खाती रिक्त आहेत. कोणाला कोणते खाते मिळतील याचा निर्णय पंतप्रधान मोदी घेतील. दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतंय हे सर्वांना माहित आहे.

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. स्वतःच्या मुख्यमंत्र्यांना बेडकाची उपमा देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. अनिल बोंडे यांनी ते वक्तव्य मागे घेतलं. त्यांनी माणुसकी दाखवली, असेही केसरकर म्हणाले.

जाहिरात वाद ते भ्रष्टाचार; अजितदादांच्या गंभीर आरोपांनी शिंदे-फडणवीस घायाळ

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube