जाहिरात वाद ते भ्रष्टाचार; अजितदादांच्या गंभीर आरोपांनी शिंदे-फडणवीस घायाळ

जाहिरात वाद ते भ्रष्टाचार; अजितदादांच्या गंभीर आरोपांनी शिंदे-फडणवीस घायाळ

Ajit Pawar on Shinde-Fadanvis : गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात मोठी घटना म्हणजे राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून झालेला वाद. त्यानंतर शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. त्याचबरोबर राज्यात महिला अत्याचार, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, जातीय तणाव, पोलीस खात्यात राजकीय हस्तक्षेप हे सर्व गंभीर मुद्दे समोर येत आहेत यावरून विरोध पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) हे एकनाथ शिंदेंवर कडाडले आहेत. ( Ajit Pawar Criticize Shinde Fadanvis On Advertisement and Corruption Issue)

Radhakrishna Vikhe : ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यलय नागरिकांच्या सोयीसाठी, त्यामागे जिल्हा विभाजनाचा विचार नाही’

अजित पवार म्हणाले, मागील काही दिवसांपासून राज्यात जातीय हिंसाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. धुळे, अहमदनगर, कोल्हापूरसह राज्यातल्या इतर भागांत 10 ते 12 घटना घडल्याचं समोर आलं आहे. आम्ही कोणत्याही घटनेचं समर्थन करीत नसून राज्यात सर्वजण गुण्यागोविंदाने नांदताहेत पण निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जातीय तणाव निर्माण करून गालबोट लावण्याचं काम सुरु असल्याचं पवार म्हणाले आहेत.

Tiku Weds Sheru: कंगनाचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाली, ‘नवाजुद्दिन नव्हे तर इरफान खानला घेऊन करायचा…’

सोशल मीडियावर जे कोणी लोकं अशी पोस्ट. क्लिप व्हायरल करताहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, दंगलीच्या मागचा मास्टरमाईंड कोण त्याचा शोध प्रशासनाने घेतला पाहिजे पण पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरुनही अजित पवार यांनी सरकारला सोडलेलं नाही. अधिकाऱ्यांची आज बदली होते, त्यानंतर पुन्हा स्थगिती अन् तिसऱ्या दिवशी पुन्हा बदली, असे प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

‘कोणीतरी डोळे वटारले, अन् दुसरी जाहिरात छापली’; जयंत पाटलांनी शिंदे गटाला डिवचलं

राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दर ठरलेले आहेत त्यानूसार बदल्या होत आहेत. शिंदे गटाचे 40 आमदार नाराज होऊ नये म्हणून सरकार त्यांच्या सांगण्यावरुन अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं, सरकार 20 जणांचं आहे, कमी मंत्र्यांमध्ये काम सुरू आहे. एकाच मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे. तर ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांचे फोटो जाहिरातबाजीत आहेत. असे आरोप देखील अजित पवारांनी केले आहेत.

दरम्यान शेतकऱ्यांवर बोलताना अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. शेजारच्या राज्यांमध्ये शेती मालाला चांगला भाव, आपल्याकडे भाव मात्र कमी आहे. सरकार मात्र शेती मालाच्या विषयी बघायला तयार नाही. ग्राहक आणि उत्पादक यांच्यात समन्वय सरकारने साधायला हवा. खतांच्या किंमती वाढवल्या जाताय, साठेबाजी सुरू आहे, बोगस बियाणे विक्री सुरू आहे.पण कृषी विभाग कारवाईचा आव आणतो.

दरम्यान, शिवसेनेकडून सुरु असलेल्या जाहिरातबाजीच्या मुद्द्यावरही अजित पवार चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहेत.शिवसेनेकडून सुरु असलेल्या जाहिरातबाजीच्या मुद्द्यावरही अजित पवार चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहेत. विरोधकांसह भाजपने भूमिका मांडल्यानंतर लगेचच जाहिरात बदललीय, वाटेल तशा जाहिरात कशा लावू शकता? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube