Manoj Jarange : पीडितेच्या आईची नाराजी अन् जरांगेंनी घेतलं कोपर्डीतील पीडितेच्या समाधीचे दर्शन

Manoj Jarange : पीडितेच्या आईची नाराजी अन् जरांगेंनी घेतलं कोपर्डीतील पीडितेच्या समाधीचे दर्शन

Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील आंदोलन ते महाराष्ट्रभर दौरा केला. त्यात आता राज्याचा दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगे हे ठिक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यात शुक्रवारी राजगुरूनगरमध्ये आणि आज 21 ऑक्टोबरला सोलापूरात भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी कोपर्डी प्रकरणातील पिडीतेच्या समाधीचे दर्शन घेतलं.

तिकिट वाटपावरुन भाजप कार्यालयात राडा, केंद्रीय मंत्र्यांना धक्काबुक्की

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यातून मनोज जरांगे यांचा दौरा गेला. मात्र त्यावेळी त्यांनी कोपर्डी येथे येऊन पीडितेच्या समाधीचे दर्शन घेतलं नाही. अशी खंत पीडितेच्या आईने व्यक्त केली होती. त्यानंतर जरांगेंनी कोपर्डीला भेट दिली. दरम्यान यावेळी या पिढीतेच्या आईने मराठा आरक्षणावर आपली परखड भूमिका मांडली.

खडसे नावामुळं मला डावलल जातं असेल तर…; रक्षा खडसेंनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी

त्यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारला देण्यात आलेली मुदत, दहा दिवस वाढवण्यात आली होती. मात्र ही मुदत देखील 24 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यानंतर जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे 25 तारखेपासून जे आंदोलन करायचा आहे. ते कोपर्डीतील या निर्भयाच्या समाधीपासून करण्यात येईल करण्यात येईल. तसेच मी स्वतः मराठ्यांसाठी रस्त्यावर उतरेन फक्त मराठ्यांनी एकत्र आला पाहिजे असा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube