Dada Bhuse : याच चांडाळ-चौकडीने शिवसेनेचा घात केला

Dada Bhuse : याच चांडाळ-चौकडीने शिवसेनेचा घात केला

नाशिक : आम्ही कालपर्यंत सोबत होतो, तर चांगले मात्र आज अचानक एवढे वाईट झालो का? असा सवाल मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उपस्थित केला आहे. आज शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) निमित्ताने नाशिकमध्ये शिंदे गटाच्या वतीने भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”हे वाईट आहे, मला अशा लोकांची कीव येते. कालपर्यंत सोबत सहकाऱ्यांबद्दल कुणी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कशी टीका करू शकतं”, असा गंभीर सवाल दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या आरोपानंतर उपस्थित केला आहे.

Ramesh Bagve : ‘मतां’साठी भाजपचे घाणेरडे राजकारण!

पुढे दादा भुसे म्हणाले, आज शुभ दिवस आहे. सध्या अनेक उत्सवाचं वातावरण असून ते साजरे केले जात आहेत. महाशिवरात्री, एकलव्य जयंती त्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. देवाच्या आशिर्वादामुळे श्रीराम चंद्राचे, बाळासाहेब ठाकरे यांचे शिवधनुष्य एकनाथ शिंदे यांनी मिळालं. मात्र अशा पद्धतीने सुंदर वातावरणात असे आरोप करणं चुकीचं असल्याचंही भुसे म्हणाले आहेत.

संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही कालपर्यंत सोबत होतो, अवघे शिवसैनिक सोबत होते, आमचं गुणगान गायलं जात होतं, मध्यंतरीच्या काळात ही घटना घडली आणि आज आमच्यावर आरोप केले जातात. आज आम्ही वाईट झालो. कीव येते, अशा व्यक्तींची जेव्हा अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन कोणी काही बोलतं. सकाळी-सकाळी टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करत सुटतात, अशी टीका यावेळी भुसे यांनी केली आहे.

दादा भुसे म्हणाले की, अशा पद्धतीने टीका करणे चुकीचे असून आम्हीही बोलू शकतो, शिवसैनिक बोलू शकतो. घरात बसून शिवसेना वाढलेली नाही. यासाठी अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडवलं आहे. अनेकांनी जीवाच रान केलं आहे. खरं म्हणजे याच चांडाळ-चौकडीने शिवसेनेचा घात केल्याचा आरोप दादा भुसे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube