लव्ह जिहाद कायद्याबद्दल खासदार सुजय विखेंचं मोठं विधान, सभागृहात…

लव्ह जिहाद कायद्याबद्दल खासदार सुजय विखेंचं मोठं विधान, सभागृहात…

Sujay Vikhe On Law of Love Jihad : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चार्चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू माता भगिनींवरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव्ह जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज आहे. अशा जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच लव्ह जिहादचा कायदा संसदेत आणण्यासाठी सभागृहात भूमिका मांडणार असल्याचे प्रतिपादन खासदार विखे यांनी केले आहे.(MP Sujay Vikhe patils big statement On Law of Love Jihad ahmednagar rahuri Hindu Janakrosh Morcha)

राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा; कॉंग्रेस, ठाकरेंवर नितेश राणेंचा हल्लाबोल

राहुरी येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राहुरीच्या वायएमसी मैदानातून हा मोर्चा निघून शहरातील जुने बस स्थानक, शुक्लेश्वर चौक, शनी चौक, मार्गे जुन्या सरकारी दवाखान्याच्या परिसरात या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या मोर्चास भाजपा आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘भाजपमध्ये येण्यासाठी रांग पण, फडणवीसांनी नो रूम अॅव्हेलेबलचा बोर्ड लावलाय ‘

यावेळी सुजय विखे पाटील म्हणाले की, संसदेचे सध्या अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अविश्वासाच्या ठरावाप्रसंगी बोलताना लव्ह जिहादच्या कायद्याविषयी आपण निवेदन करणार आहे. अलीकडच्या काळात अशा घटना दुर्दैवाने वाढत आहेत. कोणतेही सरकार अशा घटना घडव्यात यासाठी काम करत नसते. मात्र सरकार अशा समस्या नष्ट करण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून त्यावर उपाय काढते.

नगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या दोन तीन घटना घडल्या असून पोलीस प्रशासनास वेळोवेळी कडक शब्दात सूचना आपण केल्या असल्याचे सांगताना खासदार विखे म्हणाले की, जिल्ह्यातील माता भगिनींच्या पाठीशी आपण आहोत म्हणून तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही, आणि हाच विश्वास देण्यासाठी या मोर्चात आपण सहभागी झालो आहोत असे सांगितले. संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांच्या गदारोळामुळे अनेक महत्वाचे विषय सभागृहात चर्चेला येत नाहीत, त्यामुळे जनतेचेच नुकसान होत आहे.

या आठवड्यात अविश्वास ठरावावर चर्चा होणार असून यात लव्ह जिहाद कायदा करण्यासंदर्भात आपण नक्की निवेदन करू असे त्यांनी सांगितले. जनआक्रोश मोर्चातून नागरिक आपली भूमिका मांडत आहेत ही चांगली गोष्ट असली तरी कुठल्या एका समाजाला आपण टार्गेट करत नाही, हे लक्षात घेऊन शासनही हा कायदा आणण्यापूर्वी याचा संपूर्ण अभ्यास नक्की करेल असे सांगितले. कायद्याच्या दृष्टीने अत्यावश्यक त्या सर्व बाजू पडताळून मग सरकार हा कायदा नक्की लागू करेल असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube