Nashik Crime : लिप्स्टिक, रोजा, अन् हिंदु मैत्रीणी…नाशिकच्या IT कंपनीत धर्मांतराचा खेळ
नाशिकच्या नामंकित कंपनीतील धर्मांतराचा प्रकार आणि महिलांचे शोषण प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजलीयं.
Nashik News : तू विशिष्ट धर्माचा पोशाख परिधान कर, छान दिसशील, लिप्स्टिक नकोस लावू आणि हिंदू तरुणींसोबत जेवण करु नकोस,…कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीला (Nashik News) असं सांगितलं अन् विशिष्ट धर्माच्या गोष्टी फॉलो करुन धर्मांतरासाठी ब्रेनवॉश केल्याचा धक्कादायक प्रकार देवभूमी नाशिकमध्ये घडलायं. एका नामंकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण करुन धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघड झालायं.
काँग्रेसची माघार, पण बिचुकले-करुणा मुंडेंचा शड्डू बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर 22 उमेदवार रिंगणात
नाशिकमधल्या कंपनीत सुरु असलेल्या प्रकाराबाबत एका पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या गोष्टींचा छडा लावलायं. पीडितेच्या तक्रारीनुसार कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकार घडत असल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर संशयित आरोपींनी पीडित तरुणीवर प्रभाव टाकून दोन वर्ष महिनाभर उपवास पकडण्यास सांगितलं होतं. हिंदु मैत्रिणींसोबत जेवण करु नकोस, लिप्स्टिक लावण्यासही पीडितेवर मज्जाव केल्याचं समोर आलंय.
नामंकित कंपनीतील संशयित आरोपींची ही कार्यपद्धती अतिशय नियोजनबद्ध होती. फक्त तरुणच नाही तर काही विशिष्ट धर्मीय तरुणींचाही यामध्ये समावेश होता. या तरुणींशी जवळीक साधून तुला विशिष्ट धर्माचा पोषाख छान दिसेल, एकदा ट्राय करून तर बघ” असे सांगून त्यांना मानसिकरीत्या तयार करण्याचा प्रयत्न करत असत. वेळप्रसंगी यासाठी जबरदस्तीही केली जात असल्याचं समोर आलंय.
पोलिसांनी या रॅकेटमधील पाच मुख्य संशयितांना अटक केली आहे. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी संशयित आरोपींची नावे असून न्यायालयाने या पाचही आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Baramati By Election : दोन पावलं मागे अन् मोठी झेप; बारामतीत काँग्रेसच्या माघारीमागची खरी स्क्रिप्ट
कामाच्या ठिकाणी महिलांच्या अवयवांकडे पाहून अश्लील हावभाव करणे आणि त्यांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे, असे प्रकार तिथे सुरू होते. केवळ महिलाच नव्हे, तर एका तरुण कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आलंय. दरम्यान, या प्रकरणी नाशिकमध्ये एकूण 9 गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी आत्तापर्यंत 6 संशयित आरोपींना बेड्या घातल्या आहेत. या आरोपींची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्याच्या विधिमंडळात धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर झाले असून धर्मांतराविरोधात राज्य सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहेत. अशातच आता नाशिक धर्मांतर प्रकार समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल असून या धर्मांतरामागे कोणाचा हात आहे का? या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु आहे.