नाशिक हादरलं ! भरदिवसा भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार
Nashik Firing On Rakesh Koshti: उत्तरप्रदेशमधील गोळीबार प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रातील नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील भाजपचा पदाधिकारी असलेल्या राकेश कोष्टीवर (Rakesh Koshti) भरदिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला सिडकोतील दत्त चौक परिसरात घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे.
घटना नेमकी काय आहे? जाणून घ्या
नाशिकात भर वस्तीत दिवसाढवळ्या भाजप पदाधिकारी व भाजप कामगार आघाडी माथाडी सेलचे जिल्हध्यक्ष राकेश कोष्टी यांच्यांवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केली आहे. दरम्यान राकेश कोष्टी हे आज सकाळी आपल्या घराजवळ उभे असताना हल्लेखार आले आणि या हल्लेखोरांनी त्यांच्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात कोष्टी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे.
हल्लाप्रकरणी एकास अटक तर अन्य आरोपींचा शोध सुरु
दरम्यान, गोळीबार झाल्याची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट तपास केला. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्लाप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबार करणारा हा सराईत गुन्हेगार असून हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव जया दिवे असे आहे. त्याचबरोबर मुख्य हल्लेखोरासोबत असलेल्या आणखी काही त्याच्या साथीदारांचा शोध पोलिस पथक घेत आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या काकांना अटक
राकेश कोष्टी सराईत गुन्हेगार
राकेश हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पंचवटी, नाशिकरोड, गंगापूर, पंचवटी या पोलिस ठाण्यांत चार खुनाच्या गुन्ह्यांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, कट रचणे, लुटमार, हाणामारी, सरकारी कामात अडथळा आदी गंभीर स्वरूपाचे पंधरा ते वीस गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहे.