पोलिसांना केलेलं ‘ते’ आवाहन संजय राऊतांना भोवलं, गुन्हा दाखल

पोलिसांना केलेलं ‘ते’ आवाहन संजय राऊतांना भोवलं, गुन्हा दाखल

Nashik Police Registered Case Against Sanjay Raut : आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत भर पाडणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये असे जाहीर आवाहन राऊत यांनी केले होते. आता राऊत यांना हेच आवाहन महागात पडले आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत हे शुक्रवारी (11 मे) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने भाष्य केले. मात्र त्यांचे हेच वक्तव्य आता त्यांना महागात पडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही; ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

नेमकं काय म्हणाले होते राऊत?
राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला बेकायदेशीर ठरवले आहेत. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्या आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, असं आवाहन संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे या वक्तव्यावरून संजय राऊतांवर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही लोकांना निवडणुका आल्या की मुंबई आठवते…मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

दरम्यान राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रलंबित प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. दरम्यान हा शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय झाला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यातच संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले अन तेच वक्तव्य त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास कारणीभूत ठरले असे दिसते आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube