मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही; ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही; ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

Sanjay Raut Criticized Sudhir Mungantiwar : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ (BJP) नेते तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विश्वासघात केल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी पहाटेचा शपविधी गरजेचा होता, असे वक्तव्य मंत्री मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते तुटून पडले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकाच वाक्यात उत्तर देत हा विषय संपवला आहे.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. त्यावर राऊत म्हणाले, मुनगंटीवार यांना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही ते आम्हाला काय सांगत आहेत, असे राऊत म्हणाले.

अंधारेंचा मुनगंटीवारांना खोचक टोला; म्हणाल्या, एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याने त्यांना..

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही मुनगंटीवार यांना सुनावले होते. अंधारे म्हणाल्या, मुनगंटीवार यांनी धडा शिकविण्याची भाषा केली. पण, एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन त्यांनी चांगलाच धडा शिकला आहे. म्हणून त्यांना आपण आगीतून उठून फुफाट्यात पडलो, असं वाटत असेल. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर अजून धास्ती घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याने त्यांची नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे बुंदसे गयी वो हौदसे नही आती हैं हे मुनगंटीवार यांच्या लक्षात येत नाही. म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत.

मुनगंटीवार काय म्हणाले ?

भाजपसोबत युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे भाजपशी कसे वागले, हे सगळ्यांना ठाऊक आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी जनादेश झुगारला. त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली. पण नंतर फसवणूक केली. यामुळं पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला.

.. म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मदतीने धडा शिकवला; शिरसाटांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube