Onion Export : ‘निर्यातबंंदी’चा निर्णय खटकला! शिंदेंच्या शिलेदाराचे थेट दिल्लीत आंदोलन

Onion Export : ‘निर्यातबंंदी’चा निर्णय खटकला! शिंदेंच्या शिलेदाराचे थेट दिल्लीत आंदोलन

Onion Export Ban : केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यातबंदीचा निर्णय (Onion Export Ban) घेतला. या निर्णयामुळे कांद्याच्या किंमती नियंत्रणात येऊन ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी थेट दिल्लीत गळ्यात कांद्याची माळ घालून अनोखे आंदोलन केले. केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल (Piyush Goel) यांची भेट घेतली. कांदा निर्यातबंदी मागे घ्या तसेच योग्य भावात कांदा खरेदी करा, कांदा खरेदी केंद्र सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली.

लोखंडे यांच्या या मागणीला यश येईल अशी शक्यता आहे. नगर जिल्ह्यातील कांद्याला रास्त भाव देण्याबरोबरच जिल्ह्यात लाल कांदा खरेदी केंद्र लवकरच सुरू करू, असे आश्वासन मंत्री गोयल यांनी दिल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.

Onion Price : दोन दिवसांचाच कांदा खरेदी कराल; उर्वरित कांद्याचे करायचे काय? तुपकरांचा सरकारला सवाल

नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजारभाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा. शिर्डी येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी संबंधितांना दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव‍ लोखंडे यांनी दिली. लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. लोखडे यांनी गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली.

नगर जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू होणार 

नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या 24.03 रुपये प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र नगरमध्ये याच कांद्याला 20.75 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. हे तीन रुपयांचे नुकसान भरुन काढण्यासाठी केंद्र शासनाने केंद्रीय कृषी सचिवांमार्फत संबंधितांना आदेश द्यावेत व अहमदनगर जिल्ह्यातही 24.03 प्रति किलोप्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा अशी मागणी सदाशिव लोखंडे यांनी केली. नगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे. केंद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी हटवून कांदा निर्यात लवकर सुरु करावे ही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा अशी मागणी खासदार लोखंडे यांनी केली.

Onion Minimum Export Price: कांदा करणार वांदा ! निर्यात शुल्कामध्ये मोठी वाढ

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube