निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी कधी सुटणार? पालकमंत्र्यानी सांगितली तारीख

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी कधी सुटणार? पालकमंत्र्यानी सांगितली तारीख

Nilwande Dam : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या कालव्यातून २७ सप्टेंबर पासून पाणी सोडण्यात येईल, अशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात दिली.

संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते.

महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, महिलांना देशपातळीवर आरक्षण देऊन देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासन आपल्या दारी योजनेत जिल्ह्यात जवळपास २४ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. एक रूपयात पीक विमा सारखी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी योजना आणली. यामुळे जिल्ह्यात ११ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला‌. राज्यात ‘शासन आपल्या दारी’ योजनेत दीड कोटी लाभार्थ्यांना‌ लाभ मिळाला आहे.

हिंदूंनो, कॅनडा सोडून भारतात जा; खलिस्तानी-दहशतवाद्याने कॅनडास्थित भारतीयांना धमकावलं

राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील . ऑनलाईन दाखल्यांसाठी फी आकारणी करणारी सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारी आल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल. अवैध वाळू वाहतूकीला लगाम बसला आहे. जलजीवन मिशन मधील अवैध कामांना आळा घालण्यासाठी काम करण्यात येईल अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

जिल्हाधिकारी‌ सालीमठ म्हणाले , शासन आपल्या दारी उपक्रमांत आपण वेगवेगळ्या विभागांना २५ लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. आज संगमनेर मधील ११०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिला आहे.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कृषी यांत्रिकीकरणात २३ टॅकर व नगरपालिकेला ४ घंटागाड्याचे वाटप करण्यात आले. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातील अमृत कलक्ष यात्रा व्हॅनचे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube