विखे पाटील 8 तास जनता दरबारात; रात्री 11 पर्यंत नागरिकांची गर्दी

विखे पाटील 8 तास जनता दरबारात; रात्री 11 पर्यंत नागरिकांची गर्दी

अहमदनगर : नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी जनता दरबार हा भरवला जात असतो. अनेक लोकप्रतिनिधी जनता दरबारचे आयपजन करून जनतेच्या समस्यां मार्गी लावत असतात. मात्र नुकताच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार पार पडला. हा जनता दरबार चांगलाच चर्चेचा ठरला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरु झालेला दरबार तब्बल आठ तास म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होता. नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वत: प्रश्न ऐकून घेऊन तो सोडविण्यासंबंधी जागेवरच सूचना करतात, म्हणून यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान तब्बल 8 तास चाललेल्या या दरबारातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत मंत्री विखे पाटलांनी आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली. ( Radhakrishna Vikhe Patil Janata Darbar )

राज्यातील काही मोजके राजकारणी नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करतात. मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रशासनातील अधिकारी आणि नागरीक यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न जनता दरबारातून होत असतो. महिन्यातून एकदा आशा जनता दरबाराचे आयोजन मंत्री विखे पाटील यांच्या कडून केले जाते. मतदार संघासह जिल्ह्यातील नागरीक आणि कार्यकर्ते आवर्जून या दरबारात येवून आपल्या समस्या विखे पाटील यांच्या कानावर घालतात. शक्य असेल तिथेच संबंधित विभागाच्या अधिका-यांना या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या सूचना दिल्या जातात.

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’, फडणवीसांचं नाव घेण्याची लायकी नाही; तुषार भोसलेंचा निशाणा

सार्वजनिक प्रश्नाच्या संदर्भात योग्य समन्वय साधून नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंत्री विखे पाटील यांच्या आशा दरबारातून होत असल्याने अनेक गुंतागुंतीच्या प्रश्‍नामध्‍ये योग्य मार्ग निघत असल्याचा अनेकांचा अनुभवच या दरबाराचे फलित असल्याचे नेहमीच बोलले जाते. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या दरबारात राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्‍या कार्यालयात तब्बल आठ तास थांबून रात्री 11 वाजेपर्यत त्यांनी शेवटच्या माणसाचे निवेदन स्विकारत त्यानं दिलासा देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक कागद वाचून त्यांनी काही नागरीकांच्या अर्जावर स्वत:सूचना लिहीत प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

शिंदे सरकारसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! 12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा; SC ने स्थगिती उठवली

रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात भेटणाऱ्या लोकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. दोन वाजता सुरू झालेल्या दरबारात रात्री अकारा वाजता रांगेतील शेवटच्या माणसाचा अर्ज स्विकारत व तो नागरिक भेटेपर्यंत विखे पाटील थांबून राहिले तसेच त्याचे काम मार्गी लावूनच त्यांनी उपक्रम थांबविला. असे असले तरी एकीकडे जनता दरबाराला प्रतिसाद मिळतो व नागरिकांचे कामे मार्गी लागतात, हे खरे असले तरी या मुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube