शिवनिर्धार यात्रेत अक्षय कर्डिले यांचा गावागावांत थेट जनसंवाद; विकासाचा निर्धार ठाम
Rahuri By-elections-कर्डिले यांनी थेट संवाद साधत जनतेच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा ठोस शब्द दिला आहे.
Rahuri By-elections : राहुरी तालुक्यात युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांची ‘शिवनिर्धार यात्रा’ सध्या प्रचंड उत्साहात सुरू आहे. गावागावांत नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न अधिक तीव्र केला आहे. या यात्रेदरम्यान चिंचविहिरे, गणेगाव, कणगर, वडणेर, ताराहाबाद, गाडकवाडी, बेलकरवाडी, वाबळेवाडी, वरशिंदे, कोळेवाडी, शेरी, चिखलठाण, म्हैसगाव आणि दरडगाव थडी या गावांमध्ये भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
गावागावांत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कर्डिले यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी झालेल्या सभांमधून कर्डिले यांनी थेट संवाद साधत जनतेच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा ठोस शब्द दिला आहे. यावेळी बोलताना अक्षय कर्डिले यांनी भावनिक आणि ठाम शब्दांत सांगितले की, गेल्या 35 वर्षांपासून तुम्ही साहेबांवर जसं प्रेम केलं. तसंच प्रेम माझ्यावर ठेवा. मला फक्त एक महिना सांभाळा. त्यानंतर तुमचा प्रत्येक कामासाठी आदेश करा तो माझ्यासाठी हुकूम असेल. तुमचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. जनतेची सेवा हेच माझं ध्येय असून विकासाच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ देणार नाही.
शिवनिर्धार यात्रेच्या माध्यमातून कर्डिले यांनी केवळ संवादच नाही, तर विश्वासाचं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक गावांमध्ये कार्यकर्ते व नागरिकांनी कर्डिले यांना पुढील नेतृत्वासाठी खुले समर्थन दर्शवले. शिवनिर्धार यात्रेच्या माध्यमातून कर्डिले यांनी केवळ संवादच नाही, तर विश्वासाचं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुरी तालुक्यातील राजकीय वातावरणात नवसंजीवनी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.