Nashik Graduate Constituency: राजेंद्र विखे म्हणतात ‘सत्यजित’

Nashik Graduate Constituency: राजेंद्र विखे म्हणतात ‘सत्यजित’

अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रत्येक दिवशी नवीन ट्विस्ट येत आहे. आज दुपारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर केलाय. अशात त्यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe) यांनी देखील फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत तांबेंना जाहीर कौल दिलाय.

सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचे कडवे आव्हान आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक तांबेंचा स्टेस्टस ठेवत प्रचार करत आहे.

राजेंद्र विखे (Rajendra Vikhe) यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘सत्यजित’. आणि त्या खाली एक हिंदीतील कोट लिहित म्हटले की, ”शतरंज का एक नियम बहूत उम्दा है, चाल कोई भी चलो पर अपनों को नही मार सकते”

राजेंद्र विखे पाटील भाजपकडून नाशिक पदवीधरसाठी इच्छूक होते. त्यांचे नाव आघाडीवर देखील होते. परंतु काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन गोंधळ झाला. डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने भाजपने साधव पवित्रा घेतला. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीनंतर राजेंद्र विखे यांचे नाव मागे पडले.

भाजपकडून सत्यजित तांबे उमेदवार असतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु भाजपने सत्यजित तांबेंना शेवटपर्यत पाठिंबा जाहीर केला नाही. आणि सत्यजित तांबे देखील शेवटपर्यत भाजपपासून अंतर राखून राहिले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पाठिंबा
“आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.”

आमदार राम शिंदेंचा पाठिंबा
अपक्ष उमेदवार आमच्या नगर जिल्ह्यातील आहे. आमचा स्थानिक पातळीवरील विषय आहे. त्यामुळं आता स्थानिक पातळीवर चर्चा करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील निर्णय घेतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube